मोदींनी दिल्या राहुल गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राहुल यांना ट्विटरवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मी त्यांच्या निरोगी आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करतो, असं ट्विट मोदींनी केले आहे.

नवी दिल्ली : निवडणुकांच्या रणधुमाळीत व्यस्त असलेले काँग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा आज (ता. 19) 48 वा वाढदिवस आहे. काल रात्रीपासूनच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते व नेत्यांची गर्दी आहे. सहा महिन्यांपूर्वीच राहुल यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राहुल यांना ट्विटरवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मी त्यांच्या निरोगी आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करतो, असं ट्विट मोदींनी केले आहे. त्याचबरोबर संजय निरूपम, अभिषेक संघवी, गुरूदास कामत या जेष्ठ नेत्यांनीही राहुल गांधी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.   

 

 

 

Web Title: prime minister narendra modi wish rahul gandhi on his birthday