लोक कल्याण अन्‌ सुरक्षेला प्राधान्य : अमित शहा

लोक कल्याण अन्‌ सुरक्षेला प्राधान्य : अमित शहा

नवी दिल्ली : देशाची सुरक्षितता आणि लोकांचे कल्याण या दोनच गोष्टींना मोदी सरकारचे प्राधान्य असून, या दोन्ही गोष्टींची अधिक चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करण्यास आमचे प्राधान्य असेल, मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही या गोष्टी करू असे प्रतिपादन नवनियुक्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. शहा यांनी आज गृहमंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.

गृहमंत्रालया एवढ्या संवेदनशील विभागाची जबाबदारी पंतप्रधान मोदींनी आपल्याकडे सोपविल्याबद्दल त्यांनी मोदींचे आभार मानले, शहांनी आज नॉर्थ ब्लॉक येथे जात गृहमंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. या वेळी केंद्रीय गृहसचिव राजीव गौबा, गुप्तचर खात्याचे प्रमुख राजीव जैन आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गृहराज्यमंत्री जी. के. रेड्डी आणि नित्यानंद राय यांनीही शनिवारी पदभार स्वीकारला. 

राजनाथ संरक्षण मंत्रालयात 

भाजपचे वरिष्ठ नेते राजनाथसिंह यांनी आज संरक्षण मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारत वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची बैठकही घेतली. या वेळी संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक, संरक्षण सचिव संजय मित्रा आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्रालयाचा पदभार स्वीकारताच राजनाथ यांनी घेतलेल्या बैठकीस लष्करप्रमुख जन. बिपीन रावत, हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धानोआ आणि नवनियुक्त नौदलप्रमुख करमबीरसिंह देखील उपस्थित होते. आज सकाळी राजनाथ यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकास भेट देत हुतात्मा जवानांना आदरांजली वाहिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com