सलमान आणि आसाराम एकाच तुरुंगात

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 एप्रिल 2018

काळवीट शिकारप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेला अभिनेता सलमान खानची तुरुंगवारी अटळ आहे. कारण त्याच्या जामीन अर्जावर उद्या न्यायालयात सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे सलमान खानला आज रात्र तुरुंगातच काढावी लागणार आहे.

नवी दिल्ली : काळवीट शिकारप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेला अभिनेता सलमान खानची तुरुंगवारी अटळ आहे. कारण त्याच्या जामीन अर्जावर उद्या न्यायालयात सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे सलमान खानला आज रात्र तुरुंगातच काढावी लागणार आहे. न्यायालयाने त्याला दोषी ठरविल्यानंतर जोधपूर मध्यवर्ती कारागृहात सलमान खानची रवानगी करण्यात येणार आहे. या कारागृहातच स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसारामबापू आहे. 

asaram

 

 

जोधपूर मध्यवर्ती कारागृहात 'सेलिब्रिटी गुन्हेगार' शिक्षा भोगत आहेत. याच कारागृहात आसारामबापू हा बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षा भोगत आहे. आसारामबापूला कारागृहात व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचे समोर आले होते. आसारामबापूने कारागृहात आंघोळीसाठी गंगेचे पाणी आणि घरच्या जेवणाची मागणी कारागृह प्रशासनाला केली होती. अशा या सेलिब्रिटी न्यायालयात सलमान खानची रवानगी करण्यात येणार आहे. 

Web Title: Prisoner Salman Khan and Asaram Bapu in same jail today