Video : जेव्हा काँग्रेसच्या सभेत कार्यकर्ता म्हणतो, 'प्रियंका चोप्रा जिंदाबाद'

टीम ई-सकाळ
Monday, 2 December 2019

व्यासपीठावर जर, आपल्या नेत्या ऐवजी हिरॉईनच्या नावानं घोषणा देण्यात आली तर? होय असं घडलंय आणि ते काँग्रेसच्या व्यासपीठावरून घडलंय. 

नवी दिल्ली : एखाद्या राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर चूक होणं काही नवं नाही. सूत्रसंचालन करणाऱ्यांच्या चुकांचे अनेक किस्से आपल्याला पहायला ऐकायला मिळतात. कधी कधी त्यांना व्यासपीठावर उपस्थित नेत्यांची नावं माहिती नसतात. एखाद्यानं पक्ष बदलाल असला तर, तो जुन्याच पक्षाची घोषणा देतो, असं पहायला मिळतं. पण, व्यासपीठावर जर, आपल्या नेत्या ऐवजी हिरॉईनच्या नावानं घोषणा देण्यात आली तर? होय असं घडलंय आणि ते काँग्रेसच्या व्यासपीठावरून घडलंय. 

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे एप डाऊनलोड करा

काय घडलं?
दिल्लीत सध्या आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं काँग्रेस मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्ली काँग्रेसची जबाबदारी सध्या सुभाष चोप्रा यांच्याकडे आहे. सुभाष चोप्रा यांच्या उपस्थितीतच एका जाहीर सभचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी एका उत्साही कार्यकर्त्यानं पक्षातील वरिष्ठ नेत्यांची नावं घेतली. त्याला उपस्थितांमधूनही जिंदाबाद प्रतिसादही मिळत होता. काँग्रेस पार्टी जिंदाबाद, सोनिया गांधी जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद, अशी घोषणाबाजी सुरू होती. त्यातच पठ्यानं प्रियंका गांधी यांच्याऐवजी प्रियंका चोप्रा असं नाव घेतलं. काहींनी त्याला प्रतिसाद देत जिंदाबादही म्हटलं. पण, या मुळं व्यासपीठावर एकच खळबळ उडाली. ज्येष्ठ नेत्यांना हा प्रकार लक्षात आला. पण, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. व्यासपीठावर उपस्थित माजी आमदार सुरेंद्र कुमार यांनी संबंधित कार्यकर्त्याला प्रियंका गांधी म्हण, असं हळूच सांगितल्यानंतर त्यानं पुन्हा प्रियंका गांधी जिंदाबाद, अशी घोषणा केली.  सध्या ट्विटरवर हा व्हिडिओ प्रचंड शेअर केला जात आहे. 

वाचा ही बातमी - हा महाराष्ट्राला धोका : संजय राऊत 

वाचा ही बातमी - 'फडणवीसांचे चार दिवसांचे सरकार ही एक चाल'

युजर्सनी उडवली खिल्ली 
ट्विटरवर सध्या या व्हिडिओची खिल्ली उडवली जात आहे. काहींनी या व्हिडिओवर मिम्स तयार केले असून, या व्हिडिओच्या ट्विटरला रिप्लाय केले आहेत. 
 

Image

Image

Image

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Priyanka Chopra zindabad slogans in delhi congress rally instead gandhi