राहुल गांधींच्या निष्क्रियतेमुळे प्रियंका गांधींची राजकारणात एंट्री : संबित पात्रा

वृत्तसंस्था
बुधवार, 23 जानेवारी 2019

नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्या निष्क्रियतेमुळे प्रियंका गांधी यांची सक्रिय राजकारणात एंट्री झाली आहे, अशा शब्दांत भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. तसेच काँग्रेससाठी त्यांचे कुटुंबच एक पक्ष आहे. तर भाजपमध्ये पक्ष कुटुंब आहे, असेही ते म्हणाले.

राहुल गांधी यांच्यावर टीका करत संबित पात्रा पुढे म्हणाले, या निर्णयामुळे सार्वजनिकरित्या राहुल गांधी यांची निष्क्रियता दिसून येत आहे. आता त्यामुळेच प्रियंका गांधी यांना पर्याय म्हणून पुढे आणले गेले आहे. आज पुन्हा एकदा राहुल गांधी अपयशी ठरल्याचे यातून दिसत आहे. उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष या दोन्ही पक्षांतील आघाडीत काँग्रेसला सामावून घेण्यात आले नाही. तसेच बिहारमध्येही काँग्रेस अपयशी ठरले आहे. त्यामुळे आता प्रियंका गांधींना पर्यायाच्या रुपात त्यांना शोधण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी सांगितले, की काँग्रेसने प्रियंकाला जबाबदारी सोपविण्याची घोषणा केली आहे, या घोषणेमुळे राहुल गांधी अपयश झाल्याचीच एक घोषणा आहे. 

Web Title: Priyanka Gandhi Entry is Because of Rahul Gandhi Inactivity Says BJP Leader Sambit Patra