esakal | Lakhimpur : प्रियांका गांधींची ४८ तासांनंतर सुटका, राहुल गांधींसह लखीमपूरकडे रवाना
sakal

बोलून बातमी शोधा

Priyanka-Gandhi

प्रियांका गांधींची ४८ तासांनंतर सुटका, लखीमपूरकडे रवाना

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना सोमवारी अटक करण्यात आली होती. आज (बुधवार) रात्री त्यांची सुटका करण्यात आली. सीतापूरचे सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट प्यारेलाल मौर्य यांनी पीटीआयशी बोलताना प्रियांका गांधी यांची सुटका केल्याचं सांगितलं. दरम्यान, राहुल गांधी यांनी त्यांची भेट घेतली त्यानंतर दोघेही पुढे लखीमपूरकडे रवाना झाले.

या बहिण-भावांसोबत काँग्रेस नेते रणदीप सुर्जेवाला, दीपिंदर हुडा हे देखील लखीमपूरकडे निघाले आहेत. त्यांच्या या शिष्टमंडळासोबत पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे देखील सहभागी आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते सचिन पायलट हे देखील लखीमपूरकडे निघाले होते पण त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी मोरादाबाद येथे अडवलं.

राहुल गांधी बुधवारी संध्याकाळी सीतापूर येथे पोहोचले. दरम्यान, पोलिसांनी त्यांचा ताफा काही काळ अडवून ठेवला होता. त्यामुळे सीतापूर हायवेवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली यावेळी त्यांची पोलिसांसोबत बाचाबाचीही झाली.

loading image
go to top