esakal | भारतात अमेरिकेच्या लशीची निर्मिती; जपान अर्थसाह्य करणार
sakal

बोलून बातमी शोधा

quad-vaccine

कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपान एकत्र आले आहेत. चारही देशांच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येऊन ‘क्वाड व्हॅक्सिन’ बाबत पुढाकार घेण्याची घोषणा केली. त्यानुसार जपानच्या अर्थसाह्याने भारतात अमेरिकी लसची निर्मिती केली जाणार  आहे.

भारतात अमेरिकेच्या लशीची निर्मिती; जपान अर्थसाह्य करणार

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली - कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपान एकत्र आले आहेत. चारही देशांच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येऊन ‘क्वाड व्हॅक्सिन’ बाबत पुढाकार घेण्याची घोषणा केली. त्यानुसार जपानच्या अर्थसाह्याने भारतात अमेरिकी लसची निर्मिती केली जाणार  आहे. या लशीचा हिंद-प्रशांत क्षेत्रातील देशांना पुरवठा करण्यासाठी ऑस्ट्रेलिया लॉजिस्टिक सहकार्य करेल. या योजनेतंर्गत २०२२ च्या अखेरपर्यंत १ अब्ज लस तयार करण्याचे ध्येय ठेवले आहे. याशिवाय तीन कार्यकारी गट देखील स्थापन करण्यात आले आहेत. त्यात क्वाड व्हॅक्सिन एक्स्पर्ट ग्रुप, क्वाड क्रिटिकल ॲड इमर्जिंग टेक्नॉलॉजी ग्रुप आणि क्वाड क्लायमेंट वर्किंग ग्रुप असे या गटाची नावे आहेत.

क्वाड देशाच्या पहिल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन, जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. चारही देशांनी आपल्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करुन देताना जगातील अन्य देशांना देखील लशीची सोय करुन देण्यासाठी एकत्ररित्या काम करण्याची तयारी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अमेरिका लशीची क्षमता वाढवण्यासाठी बायोलॉजिकल इ लिमिटेडसमवेत काम करणार आहे. बायोलॉजिकल इ लिमिटेडला २०२२ शेवटपर्यंत १ अब्ज डोस तयार करण्याच्या क्षमतेसाठी मदतीची गरज आहे. यात जॉन्सन ॲड जॉन्सनची लस देखील तयार केली जाईल. ही लस आरोग्य संघटनेच्या निकषानुसार तयार केली जाईल. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील लस निर्मिती करण्याची क्षमता ही ही अमेरिकेच्या लशीचे उत्पादन वाढवण्यासाठी साह्यभूत ठरेल.

'राष्ट्रीय सुरक्षेसाठी बुरख्याला बंदी'; भारताच्या शेजारी देशात सरकारचा विचार

‘क्वाड पर्यावरण कार्यकारी समूह’
क्वाड समूहाच्या बैठकीत क्वाड देश आणि हिंद प्रशांत भागातील वातावरण बदलाच्या मुद्द्याला प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी क्वाड क्लायमेट वर्किंग ग्रुप (क्वाड पर्यावरण कार्यकारी समूह) स्थापन केला जाणार आहे. हा गट क्वाड देश आणि अन्य देशांना एकत्र येऊन पॅरिस करार लागू करण्यासाठी सहकार्य करेल. हा गट कमी उर्त्सजन करणाऱ्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्याचे काम करेल.

Edited By - Prashant Patil