सौरऊर्जेवर चालणाऱ्या ‘इ सायकल’ची निर्मिती

ओडिशाची राजधानी भुवनेश्वरपासून १२० किलोमीटरवर असलेल्या रजनिका या गावातील रहिवासी असलेल्या सौम्यरंजनने त्रुटींवर मात करत अनेक चाचण्या घेतल्यानंतर ही ई-सायकल बनविली.
Cycle on Solar Power
Cycle on Solar PowerSakal
Summary

ओडिशाची राजधानी भुवनेश्वरपासून १२० किलोमीटरवर असलेल्या रजनिका या गावातील रहिवासी असलेल्या सौम्यरंजनने त्रुटींवर मात करत अनेक चाचण्या घेतल्यानंतर ही ई-सायकल बनविली.

केंद्रपाडा - गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे (Fuel) दर सातत्याने वाढत असल्याने इलेक्ट्रॉनिक वाहनांची (Electronic Energy) खरेदी (Purchase) वाढत आहे. मात्र, अशा वाहनांची बॅटरी वीज (Electricity) वापरून चार्ज (Charging) करावी लागते आणि विजेची निर्मिती प्रामुख्याने कोळसा वापरून होत असल्याने प्रदूषणाला (Pollution) हातभार लागतोच, असा युक्तिवाद केला जातो. ओडिशातील केंद्रपाडा जिल्ह्यातील सौम्यरंजन पलेई या २८ वर्षीय युवकाने यावर उपाय शोधला असून त्याने सौरऊर्जेवर चालणाऱ्या इ सायकलची निर्मिती केली आहे. ही सायकल प्रतितास २५ किलोमीटर वेगाने धावू शकते.

ओडिशाची राजधानी भुवनेश्वरपासून १२० किलोमीटरवर असलेल्या रजनिका या गावातील रहिवासी असलेल्या सौम्यरंजनने त्रुटींवर मात करत अनेक चाचण्या घेतल्यानंतर ही ई-सायकल बनविली. तो इलेक्ट्रिशियन असून त्याने सायकलच्या इंजिनच्या बाजूला सौर पॅनेल बसविले. रस्त्यावरून चालवण्यायोग्य सायकल बनविण्यासाठी त्याला तब्बल तीन महिने लागले. त्यानंतर, नुकतेच शनिवारी(ता. २३) त्याने या ई सायकलवरून रजनिकामधील आपल्या घरापासून बालासोरपर्यंतचा ११० किलोमीटरचा प्रवास केला. या मार्गावर विश्रांती घेत प्रवास केल्याने सात तास लागले. या अनोख्या ई सायकलने रस्त्यावर अनेकांचे लक्ष वेधून घेतले. तिला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

अलीकडच्या काळात इंधनाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. वाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाचविण्यासाठी सौर ऊर्जेवर चालणारी अशा प्रकारची ई-सायकल उपयुक्त ठरू शकते. ही सायकल पर्यावरणपूरक व इतर ई सायकलपेक्षा स्वस्त आहे.

- सौम्यरंजन पलेई, सौर ऊर्जेवरील इ सायकलीचा निर्माता

सायकलीची वैशिष्ट्ये

सायकलवरील सौर पॅनेलच्या माध्यमातून बॅटरी चार्ज केली जाते. सौर पॅनेल व इतर साहित्यासाठी ४० हजारांचा खर्च आला. बॅटरी पूर्णपणे चार्ज करण्यासाठी ही सायकल पाच ते सहा तास पूर्ण सूर्यप्रकाशात ठेवावी लागते. त्यानंतर, ती कोणत्याही अडथळ्यांशिवाय १५० किलोमीटर चालते. एवढेच नव्हे तर सूर्यप्रकाश नसतानाही ती इलेक्ट्रिक सॉकेटच्या माध्यमातून चार्ज करता येते. बॅटरी संपल्यावर सायकल पॅडल वापरून चालवता येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com