प्रा. भगवान यांच्या हत्येचा कट बेळगावात 

The prof bhagwan murder plan are in belgum
The prof bhagwan murder plan are in belgum

बंगळूर : पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर प्रा. के. एस. भगवान यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आल्याचे यापूर्वीच उघडकीस आले होते. संशयितांनी बेळगाव व महाराष्ट्रातील सातारा येथे एकत्र येऊन प्रा. भगवान यांचा हत्येचा कट रचल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी गौरी लंकेश हत्या प्रकरणातील अमोल काळे, के. टी. नवीनकुमारसह पाच जणांविरुद्ध 700 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणाची उप्पार पेठ पोलिस चौकशी करीत आहेत. 

उप्पार पेठ पोलिसांनी बंगळूर येथील प्रथम एसीएमएम न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. पाचही संशयितांनी बेळगाव व महाराष्ट्रातील सातारा या ठिकाणी बैठका घेऊन हत्येचा कट आखल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. अमोल काळे (वय 39), के. टी. नवीनकुमार (वय 37), सुजितकुमार (वय 37), मनोहर यडगे (वय 28) यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. न्यायवैधक प्रयोगशाळेचा अहवालही सोबत जोडण्यात आला आहे. या प्रकरणात 7 जणांना अटक करण्यात आली होती; परंतु केवळ 5 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले. 

पाळत ठेवण्यासाठी एकाची नेमणूक 
बेळगाव व सातारा येथे पाचही आरोपींनी एकत्र येऊन प्रा. भगवान यांच्या हत्येचा कट आखला. जानेवारी 2018 मध्ये चामराजनगरच्या गुंडल जंगल प्रदेशातही सर्वांनी बैठक घेऊन चर्चा केल्याचे उघड झाले आहे. म्हैसूर येथील के. एस. भगवान यांच्या निवासस्थानाजवळ संशयितांनी एका व्यक्तीची नेमणूक केली होती. त्यांच्या घराजवळ किती सीसीटीव्ही आहेत, वसाहतीतील एकंदर परिस्थिती कशी आहे, यासंबंधी ही व्यक्ती माहिती गोळा करीत होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com