पश्‍चिम बंगालमध्ये आता प्राध्यापकांना ‘अच्छे दिन’ - ममता बॅनर्जी

पीटीआय
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

पश्‍चिम बंगालमधील उच्च शिक्षण संस्थांमध्ये एक जानेवारीपासून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) सुधारित वेतनश्रेणीची अंमलबजावणी केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज केली. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर सुमारे एक हजार कोटींचा बोजा पडणार आहे. पश्‍चिम बंगालमधील महाविद्यालये आणि विद्यापीठामधील १५ हजारांहून अधिक प्राध्यापकांना संबोधित करताना बॅनर्जी यांनी वरील घोषणा केली.

कोलकता - पश्‍चिम बंगालमधील उच्च शिक्षण संस्थांमध्ये एक जानेवारीपासून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) सुधारित वेतनश्रेणीची अंमलबजावणी केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज केली. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर सुमारे एक हजार कोटींचा बोजा पडणार आहे. पश्‍चिम बंगालमधील महाविद्यालये आणि विद्यापीठामधील १५ हजारांहून अधिक प्राध्यापकांना संबोधित करताना बॅनर्जी यांनी वरील घोषणा केली. 

२०१६-१९ या चार वर्षांच्या काळातील वेतनावरील तीन टक्‍क्‍यांची वाढही या प्राध्यापकांना दिली जाणार आहे, असे बॅनर्जी यांनी सांगितले. यूजीसीच्या सुधारित वेतनश्रेणीची अंमलबजावणी करण्याची शिफारस सातव्या केंद्रीय वेतन आयोगाने केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: professor acche din in west bengal mamta banerjee