भगतसिंगांना दहशतवादी संबोधल्यामुळे नवा वाद 

पीटीआय
शनिवार, 1 डिसेंबर 2018

जम्मू : जम्मू विद्यापीठातील एका प्राध्यापकाने भगतसिंग यांच्यासंदर्भात दहशतवादी असा शब्दप्रयोग केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विद्यापीठाने एका समितीची नियुक्ती केली आहे. 

दरम्यान, आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचा दावा संबंधित प्राध्यापकाने केला आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्मा भगतसिंग यांचा मी सन्मान करतो. माझ्या विधानामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो, असे प्राध्यापकाचे म्हणणे आहे. 

जम्मू विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक मोहम्मद ताजुद्दीन यांनी गुरुवारी वर्गात शिकवत असताना भगतसिंग यांच्या संदर्भात दहशतवादी असा शब्दप्रयोग केल्याचा दावा करत काही विद्यार्थ्यांनी कुलगुरूंकडे तक्रार केली आहे. या विद्यार्थ्यांनी पुरावा म्हणून एक सीडीही सादर केली आहे. त्यानंतर तातडीने कारवाई करत कुलगुरूंनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच, या प्राध्यापकांना अध्यापन करण्यापासून रोखण्यात आल्याची माहिती विद्यापीठाच्या प्रवक्‍त्याने दिली. चौकशी समिती पुढील आठ दिवसांत आपला अहवाल सादर करणार आहे. संबंधित प्राध्यापकांचे निलंबन करण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. 

व्हिडिओचा संदर्भ चुकीचा 
प्रा. ताजुद्दीन म्हणाले, की वर्गात शिकवतेवेळी रशियन क्रांतिकारक लेनिनबद्दल बोलत असताना सरकारच्या विरोधात हिंसाचार करणाऱ्या कोणालाही सरकारकडून दहशतवादी ठरविले जाते, असे विधान मी केले होते. माझ्या दोन तासांच्या व्याखानातील 20 सेंकंदाचा व्हिडिओ दाखवून माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. हुतात्मा भगतसिंग यांचा मी सन्मान करतो. मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. चुकून असा प्रकार घडला असेल, तर मी माफी मागतो.

Web Title: Professor in Jammu University calls Bhagat Singh a terrorist

टॅग्स