धक्कादायक ! मुस्लीम नाहीत म्हणून प्राध्यापकानं १५ विद्यार्थ्यांना केलं नापास; जामिया मिलिया विद्यापीठातील घटना!

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 मार्च 2020

जामिया मिलिया इस्लामिया विश्वविद्यालयाच्या डॉ. अबरार अहमद यांनी १५ बिगर मुस्लीम विद्यार्थ्यांना नापास करण्याबाबतचे ट्विट केले.

नवी दिल्ली : जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक असलेल्या डॉ. अबरार अहमदने केलेल्या खळबळजनक ट्विटने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. १५ बिगर मुस्लीम विद्यार्थ्यांना परीक्षेत नापास करण्यात आल्याचे वादग्रस्त ट्विट डॉ. अहमदने बुधवारी (ता.२५) केले होते.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू झाल्यानंतर विद्यापीठाने डॉ. अहमदला सस्पेंड करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. या प्रकरणाची पुढील तपासणी सध्या सुरू झाली आहे. 

- कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय नाही : राजन

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) अंतर्गत अल्पसंख्यांकांना कसे टार्गेट केले जात आहे, हे मला व्यंगाच्या माध्यमातून दाखवायचे होते. माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, असे स्पष्टीकरण डॉ. अहमदने दिले आहे. 

- Fight with Corona : राहुल गांधींनी केलं मोदी सरकारचं कौतुक; म्हणाले 'सरकारने...'

डॉ. अहमदने ट्विटमध्ये म्हटले आहे की, '१५ बिगर मुस्लीम विद्यार्थी वगळता सर्व विद्यार्थी पास झाले आहेत. ज्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. जर तुम्ही सीएए विरोधात आंदोलन करत असाल, तर सीएए समर्थनार्थ असणारे ५५ विद्यार्थी माझ्याकडे आहेत. जर आंदोलन वेळीच थांबवलं नाही, तर बहुसंख्यांक तुम्हाला धडा शिकवतील. मी विचार करतोय की हे सगळे माझा तिरस्कार का करतात?'

- आहारात घ्या, 'क' जीवनसत्व असलेली फळे! वैद्यकीय तज्ज्ञांचे आवाहन

मात्र, ट्रोल व्हायला लागल्यानंतर डॉ. अहमदने ते वादग्रस्त ट्विट डिलीट केलं आहे. सामाजिक एकोपा बिघडविल्याबद्दल डॉ. अहमदला निलंबित करण्यात आल्याचे जामिया विद्यापीठाने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे. 

- कोरोनाशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जामिया विद्यापीठाने आपली बाजू मांडताना ट्विट केले आहे की, 'जामिया मिलिया इस्लामिया विश्वविद्यालयाच्या डॉ. अबरार अहमद यांनी १५ बिगर मुस्लीम विद्यार्थ्यांना नापास करण्याबाबतचे ट्विट केले. त्यामुळे केंद्रीय प्रशासकीय सेवा आचरण नियमांनुसार सामाजिक एकोपा बिघडविणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे या प्रकरणाची पूर्ण चौकशी होईपर्यंत डॉ. अहमदला निलंबित करण्यात येत आहे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Professor who said he failed 15 non Muslim students for supporting CAA suspended from Jamia Millia Islamia