Modi Cabinet : अडवानींपासून टाटांपर्यंत...शपथविधीसाठी मान्यवरांची मांदियाळी!

Modi Cabinet : अडवानींपासून टाटांपर्यंत...शपथविधीसाठी मान्यवरांची मांदियाळी!

नवी दिल्ली : देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए-2) सरकार आज (गुरुवार) स्थापन होत आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी राजकीय, मनोरंजन क्षेत्रासह अनेक मान्यवर उपस्थित आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद नरेंद्र मोदी यांना पद आणि गोपनियतेची शपथ देणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, शशी थरूर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी उपस्थित आहेत.

तसेच गायिका आशा भोसले, दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्यासह उद्योगपती मुकेश अंबानी, रतन टाटा उपस्थित आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com