यापुढे हिंसाचार करणाऱ्यांची मालमत्ता जप्त होणार!

वृत्तसंस्था
रविवार, 29 डिसेंबर 2019

जप्त करण्यात येणारी मालमत्ता नुकसानभरपाईसाठी वापरण्यात येणार आहे.​

बंगळूर : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निषेधार्थ आंदोलनाच्या काळात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या आंदोलकांची मिळकत जप्त करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन खात्याचे मंत्री सी. टी. रवी यांनी दिली. उत्तर प्रदेशात असा कायदा अस्तित्वात असून, त्याचे अनुकरण कर्नाटकातही करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मंगळुरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, "लोकशाही व्यवस्थेत हिंसाचाराला वाव नाही. संसदेत तोंडी तलाक विधेयक मंजूर झाल्यानंतर देशात आंदोलन पेटेल, अशी कॉंग्रेसची अपेक्षा होती. घटनेतील 370वे कलम रद्द केल्यानंतरही रक्तपात होईल, असा त्यांचा विचार होता.

- प्रियांका गांधींना धक्काबुक्की; उत्तर प्रदेश पोलिसांवर आरोप!

अयोध्या निकालानंतरही देशात मोठा गोंधळ होईल, अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु, त्यांच्या अपेक्षेप्रमाणे काहीही घडले नाही. त्यामुळे कॉंग्रेसने आता नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या निमित्ताने देशात आंदोलनाला चिथावणी देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.' 

- धक्कादायक : केंद्रीय मंत्री म्हणतात, 'भारत माता की जय म्हणणारेच देशात रहातील'

बंगळुरात झालेल्या दंगलीला कोणत्याच प्रकारची सवलत देण्यात येणार नाही. जप्त करण्यात येणारी मालमत्ता नुकसानभरपाईसाठी वापरण्यात येणार आहे. मंगळूर दंगलीवर राज्य सरकारने योग्य प्रकारे नियंत्रण आणले. पोलिसांनीसुद्धा योग्यप्रकारे कारवाई करून आंदोलन वेळीच शांत केल्याचे ते म्हणाले.

- मंत्रिमंडळ विस्तारातील संभाव्य नेत्यांची नावे फुटली? कोणत्या विभागाचे वर्चस्व राहणार?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Property of the agitators who are damaging the public property will be confiscated