मणिपूरमध्ये सात मंत्र्यांची कोट्यवधींची मालमत्ता

वृत्तसंस्था
बुधवार, 22 मार्च 2017

इंफाळ: मणिपूरमध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये नऊपैकी सहा मंत्री कोट्यधीश असून, त्यांची सर्वसाधारण मालमत्ता 1.26 कोटीच्या घरात आहे. "इलेक्‍शन वॉच अँड असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्स' (एडीआर) या संस्थेच्या राज्य शाखेने मंगळवारी जाहीर केलेल्या अहवालात हे नमूद करण्यात आले आहे. एकाही मंत्र्यांवर गुन्हा दाखल झाला नसल्याची नोंद प्रतिज्ञापत्रात केलेली आहे हे विशेष.

मुख्यमंत्री बिरेव सिंह यांच्यासह नऊ मंत्र्यांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्‍लेषण' "एडीआर'ने केले आहे. पश्‍चिम इंफाळ मतदारसंघातील प्रतिनिधी युमनाम जॉयकुमार यांची संपत्ती 2.29 कोटी एवढी असून, ते सर्वांत श्रीमंत मंत्री ठरले आहेत. युरिपोक मतदारसंघातील लांगपोकलांकपाम जयंतकुमार यांची संपत्ती सर्वाधिक कमी म्हणजे 23.9 लाख रुपये आहे. सात मंत्र्यांनी पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतले असून, दोन मंत्री दहावी-बारावी झालेले आहेत. नऊही मंत्र्याचे वय 40 ते 65 वर्षांदरम्यान आहे. नॉंगथोम्बाम बिरेन यांच्यावर 47.97 लाख रुपयांचे कर्ज असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

Web Title: Property worth millions seven ministers in Manipur