'शासकीय अधिकाऱ्यांपेक्षा वेश्या चांगल्या' - भाजप आमदार

वृत्तसंस्था
बुधवार, 6 जून 2018

सरकारी अधिकाऱ्यांपेक्षा चांगले चरित्र हे वेश्याव्यवसाय करण्याऱ्या महिलांचे असते. किमान वेश्या पैसे घेऊन स्टेजवर नाचतात. परंतु इथले अधिकारी पैसे घेऊनही तुमचे काम करतील की नाही याची कुठलीही शाश्वती देता येत नसल्याचे एका सार्वजनिक सभेत बोलताना सिंग यांनी सांगितले. 

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशचे भाजपचे आमदार सुरेंद्र सिंग यांनी नोकरशाहीच्या विरोधात आपली नाराजी कायम ठेवली. आपल्या समर्थकांना उत्तर प्रदेशातील अधिकाऱ्यांनी लाच मागतल्यास त्यांना "घूस" न देता एक "घुसा" देण्यास सांगितले. मंगळवारी (ता. 5) आ. सुरेंद्र सिंग म्हणाले की, वेश्या या सरकारी अधिकाऱ्यांपेक्षा अधिक चांगल्या असतात.

सरकारी अधिकाऱ्यांपेक्षा चांगले चरित्र हे वेश्याव्यवसाय करण्याऱ्या महिलांचे असते. किमान वेश्या पैसे घेऊन स्टेजवर नाचतात. परंतु इथले अधिकारी पैसे घेऊनही तुमचे काम करतील की नाही याची कुठलीही शाश्वती देता येत नसल्याचे एका सार्वजनिक सभेत बोलताना सिंग यांनी सांगितले. 

भाजप सदस्यांनी केलेल्या निष्क्रीय वक्तव्यांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्याच महिन्यात आपल्या नेत्यांना फटकारले होते. आपण चुका करून, माध्यमांना 'मसाला' देत असतो. जसे की आपण समाजाचे उत्कृष्ट वैज्ञानिक शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ आहोत.

पंतप्रधान मोदींनी सर्व भाजप नेत्यांना सावध केले होते आणि सर्व लोकप्रतिनीधींना कुठलेही निष्क्रिय वक्तव्य करण्यापासून रोखले होते. कारण अशा वक्तव्यांमुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का लागत असल्याचे त्यांनी सांगितले होते. 

परंतु, पंतप्रधानांच्या कठोर शब्दाने बलियामधील बैरीया येथील भाजपचे आमदार सुरेंद्र सिंग यांना मात्र कसलाही फरक पडलेला दिसत नाही. याआधी बलात्काराच्या वाढत्या घटनांसाठी सिंग यांनी पालकांना आणि मोबाईलला जबाबदार धरले होते. ते म्हणाले होते की पालकांनी आपल्या मुलांना मुक्तपणे फिरू द्यायला हवे. ते म्हणाले की "कोणीही तीन मुलांच्या आईवर बलात्कार करू शकत नाही." याआधी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना रामायणामधील रावणाची दुष्ट बहीण 'शूर्पणखा' संबोधून टीका केली होती आणि दावा केला होता की, बंगालमधील लोकांना जम्मू आणि काश्मीरमध्ये स्थलांतरित केले जाईल तर हिंदूंचे निर्वसन करण्यात येईल.
 

Web Title: Prostitutes Better Than Government Officials said by mp surendra singh