"ऑनलाइन शिक्षणासाठी टॅब, इंटरनेट पुरवा"

केंद्राकडे शिक्षण सचिवांची मागणीवजा सूचना; डिजिटल शिक्षण साहित्य तयार करावे लागणार
"ऑनलाइन शिक्षणासाठी टॅब, इंटरनेट पुरवा"

नवी दिल्ली: कोरोनाचा (Coronavirus) देशातील शिक्षण व्यवस्थेवर परिणाम झाला असून, महासाथीच्या काळात सर्व स्तरातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण (Education) पोचविण्यासाठी गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी (Online Study) टॅब (Tabs) आणि इंटरनेटची (Internet) सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी राज्यांच्या शिक्षण सचिवांनी आज केली. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक (Ramesh Pokhariyal) यांनी आज सर्व राज्यांतील शिक्षण सचिवांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या (VC) माध्यमातून बैठक घेतली. त्यात कोरोनाचा शिक्षणावरील परिणाम, ऑनलाइन शिक्षण आणि संबंधित अडचणी, तसेच नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, कोरोना काळात शिक्षण क्षेत्रासाठी सरकारने उचललेले पाऊल यावर चर्चा करण्यात आली. (Provide Internet Tablet PCs for Online Learning)

"ऑनलाइन शिक्षणासाठी टॅब, इंटरनेट पुरवा"
CoWIN पोर्टल आता हिंदीसह 14 प्रादेशिक भाषांमध्ये

महाराष्ट्राच्या शिक्षण सचिव वंदना कृष्णा या बैठकीला उपस्थित होत्या. कोरोना काळातही शिक्षण सुरू राहावे यासाठी महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी मोबाइल, दूरदर्शन वाहिन्यांच्या माध्यमातून प्रयत्न केले आहेत. ‘दूरदर्शन’चे शुल्क कमी करण्याची मागणी यावेळी काही राज्यांकडून करण्यात आली. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांकडे मोबाईल आणि इंटरनेट सुविधांचा अभाव असल्याचे यावेळी शिक्षण सचिवांनी केंद्रीय मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच या विद्यार्थ्यांसाठी टॅब आणि इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नोंदवण्यात आली. महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी ही मागणीवजा सूचना केल्याचे सूत्रांनी सांगितले.

"ऑनलाइन शिक्षणासाठी टॅब, इंटरनेट पुरवा"
खवळलेल्या समुद्रात कोस्ट गार्डचं यशस्वी ऑपरेशन

शिक्षक हा कोविड योद्धा

डॉ. पोखरियाल यांनी, कोविड काळात राज्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, संकटाच्या काळातही शिक्षण संस्था आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवले नाही. घरांचे रूपांतर वर्गात करून शिक्षकांनी ऑनलाइन शिक्षण दिले. त्यामुळे शिक्षक हे कोविड योद्धाच आहेत. केंद्र सरकारनेही त्यासाठी प्रोत्साहन दिले. या संकटाच्या काळात समग्र शिक्षा अभियानासाठी पाच हजार ७८४ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. देशाच्या दुर्गम भागात डिजिटल पद्धतीने शिक्षण पोचविणे कठिण आहे. अशा भागांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. त्या ठिकाणी स्थानिक स्वयंसेवक आणि विद्यार्थ्यांच्या माता-पित्यांना प्रशिक्षित करून पाल्यांचे शिक्षण पुढे सुरू ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. पोखरियाल म्हणाले, की ऑनलाइन शिक्षण हे एकतर्फी प्रवाह आहे. विद्यार्थ्याला त्याच्याशी जोडून ठेवण्यासाठी आपल्याला प्रत्येक वर्गासाठी आकर्षक डिजिटल शिक्षण साहित्य तयार करण्याच्या दिशेने जावे लागेल. त्यादृष्टीने अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com