पीएफबाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 मार्च 2020

- केंद्र सरकारने घेतला भविष्य निर्वाह निधी'वरील (पीएफ) व्याजदर घटविण्याचा निर्णय.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने भविष्य निर्वाह निधीवरील (पीएफ) व्याजदर घटविण्याचा निर्णय घेतला आहे. आता पीएफवरील व्याजदर 8.65 टक्क्यांवरुन 8.50 टक्के होणार आहे, अशी माहिती केंद्रीय कामगारमंत्री संतोष गंगवार यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप

पीएफवर देण्यात येणारे व्याजदर यापूर्वी 8.65 टक्के इतके होते. मात्र, आता यामध्ये कपात करण्यात आली आहे. त्यानुसार पीएफवर 8.50 टक्के इतके व्याजदर मिळणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातील नोकदारांना मोठा धक्का बसणार आहे. 

Image result for pf

दरम्यान, देशातील दहा सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचे विलीनीकरण करून त्यांचे चार बॅंकांमध्ये रुपांतर करण्याची प्रक्रिया सुरू असून, 1 एप्रिल 2020 पासून विलीनीकरण लागू होईल, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Provident fund interest rates lowered now 8 and Half Percentage for 2019 and 2020