पं. नेहरू, इंदिराजींनंतर मोदीच

वृत्तसंस्था
गुरुवार, 30 मार्च 2017

इतिहासकार डॉ. रामचंद्र गुहा यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि आयर्न लेडी इंदिरा गांधी यांच्यानंतर नरेंद्र मोदी हे तिसरे सर्वांत यशस्वी पंतप्रधान होऊ शकतात, असे मत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे इतिहासकार डॉ. रामचंद्र गुहा यांनी मांडले. मोदी यांच्या करिष्म्याला जाती आणि भाषेच्या मर्यादा राहिलेल्या नाहीत, असेही त्यांनी नमूद केले. "लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍स इंडिया समीट- 2017' मध्ये बोलताना त्यांनी हे मतप्रदर्शन केले.

पंतप्रधान मोदी यांची हुकूमत आणि त्यांचा अखिल भारतीय दृष्टिकोन त्यांना नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या पंक्तीमध्ये नेऊन बसवितो. नेहरू आणि इंदिराजींनंतर एवढी जबरदस्त पकड असणारा आणि ज्याच्या करिष्म्याला जाती, भाषा आणि प्रादेशिकतेची कसलीही मर्यादा नाही असा पंतप्रधान झाला नाही, असेही त्यांनी नमूद केले. भारतीय राजकारणाच्या इतिहासावर भाष्य करताना गुहा यांनी जाती प्रथा आणि महिलांना सापत्न वागणूक ही दोन निर्विवाद सत्ये असल्याचे सांगितले. हिंदू आणि मुस्लिम हे दोन धर्म महिलांना सापत्न वागणूक देतात असेही त्यांनी स्पष्ट केले. भारतीय स्वातंत्र्याची सत्तरी साजरी करण्याच्या उद्देशाने बुधवारपासून या संमेलनास प्रारंभ झाला आहे.

मोदींचे टीकाकार
इतिहासकार रामचंद्र गुहा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे टीकाकार म्हणून ओळखले जातात. काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांवरील टीकेमुळे त्यांना धमक्‍यांचे मेलही आले होते. खुद्द गुहा यांनीच ट्विट करून याची माहिती दिली होती. भाजप आणि मोदींवरील टीका थांबवा अन्यथा दिव्य महाकाल तुम्हाला शिक्षा करतील, अशा धमक्‍या त्यांना दिल्या जात होत्या.

Web Title: Pt. Nehru, Indira Gandhi after only modi