गुगलच्या डुडलवर 'भाई' 

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 8 November 2020

साहित्य क्षेत्रातील प्रसिध्द आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांची आज 101 वी जयंती आहे

पुणे: साहित्य क्षेत्रातील प्रसिध्द आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांची आज 101 वी जयंती आहे. त्यानिमित्ताने गुगलच्या डुडलवर त्यांना आदरांजली वाहण्यात आली आहे. गुगलने आपल्या होमपेजवर पुलंचा फोटो असलेले डुडल शेअर केले आहे. या डुडलमध्ये पुलं हे पेटी वाजवताना दिसत आहेत.  

साहित्य क्षेत्रात मोठं योगदान-
साहित्यासह चित्रपट, संगीत, अभिनय, नाटक आणि समाजसेवा क्षेत्रात पु. ल. देशपांडे यांचं  मोठं योगदान आहे. त्यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1919 रोजी मुंबईत झाला होता. पुलंची व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ, हसवणूक, गोळाबेरीज, असा मी असामी, अपूर्वाई, पूर्वरंग ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. तसेच पुलंनी गुळाचा गणपती, वंदे मातरम, दूधभात या चित्रपटांतही काम केलं आहे.

Who was Pl Deshpande, the Marathi writer and subject of the biopic Bhaai –  Vyakti Kee Valli?

पु. लं. देशपांडे यांच्या जयंतीनिमित्ताने गूगलच्या आर्ट्स अ‍ॅण्ड कल्चर विभागातील पुलंविषयीचे खास दालन खुले करण्यात आले आहे. यामुळे आतापर्यंत मराठी वाचक रसिकांकडून अलोट प्रेम लाभलेल्या पु. ल. देशपांडे यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आता जागतिक स्तरावर पोहोचण्यास मदत होणार आहे. गुगलसोबत ट्विटरवरदेखील पुलंना मानवंदना दिली आहे.

पु.ल.- सुनीताबाई आणि आयुका

काय आहे गुगल आर्टस अँड कल्चर?
गुगल आर्टस अँड कल्चर हे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. त्याद्वारे जगाने जतन केलेला त्यांच्या देशाचा सांस्कृतिक ठेवा, या व्यासपीठाद्वारे जगाला दाखविला जातो. उच्च दर्जाचे फोटो, कलाकृती आणि सांस्कृतिक कलाकृतींचे व्हिडिओ याद्वारे प्रत्येकजण पाहू शकतो.

पु.ल.- सुनीताबाई आणि आयुका (मंगला नारळीकर) - Saptarang Mangala Narlikar  write article Famous Literary Pu. La. Deshpande | Marathi Live News Updates  - eSakal

आता पुलंची बहुपेडी, बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे पैलू, जुनी व दुर्मिळ छायाचित्रे अवघ्या जगाला गुगल आर्ट अँड कल्चर अँपवर पाहायला मिळणार आहेत. महाराष्ट्राच्या लाडक्‍या व्यक्तिमत्त्वाने मराठी माणसाचे जीवन श्रीमंत केले, त्यांची आठवण आणि त्यांच्या आयुष्यातील क्षण गुगल जतन करीत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुलंनी आकाशवाणी आणि दूरदर्शनवरही काम केले होते. ते 1955 मध्ये आकाशवाणीमध्ये कामाला लागले होते.  1959 मध्ये पु.ल. देशपांडे भारतातील पहिले दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्माते झाले होते. तसेच दूरदर्शनच्या पहिल्यावाहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पुलं हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते. 

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pu La Deshpande 101 birth anniversary google doodle