‘पबजी’ खेळण्यावर आता वेळमर्यादा?

pubg
pubg

नवी दिल्ली : वेगवोगळे गोम्स खेळण्याचं फॅड येत असत. तसं सध्या 'पबजी' खेळण्याचं फॅड आहे. 'पबजी'च्या आहारी गेल्याने अनेक चूकीच्या गोष्टी समोर येत आहेत. या गेममुळे आत्महत्याही वाढू लागल्या आहेत. त्यामुळेच आता या खेळावर वेळमर्यादा आणण्याचा विचार सुरू आहे. तसे झाल्यास दिवसभरात केवळ सहा तासच हा खेळ खेळता येणार आहे. 

गुजरातमधील राजकोट आणि सूरत या दोन शहरात राज्य सरकारने पबजीवर बंदी घातली आहे. तसेच असा प्रकारे चोरुन गेम खेळणाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात येत आहे. तसेच देशातील इतर राज्यांतूनही पबजीवर बंदी घालण्याची सातत्याने मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर पबजी खेळावर वेळेची मर्यादा घालण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचे कळाले आहे. 

काय आहे पबजी?
पबजी (PUBG) हा शब्द ‘पब्लिक अननोन बॅटल फिल्ड’ या टर्मचा शॉर्टकट आहे. अर्थात गेमच्या नावावरूनच अनोळखी लोकांशी मारामारी करणे हा या गेमचा मूळ उद्देश असतो हे समजते. आकर्षक व्हिज्युअल्स आणि सतत होत राहणाऱ्या अ‍ॅक्शनमुळे तरुणाईला या गेमची भुरळ पडली आहे. वाळवंट, शहर आणि जंगल अशा तीन थीममध्ये एकटय़ाने किंवा दोघांची अथवा चौघांची टीम बनवून हा गेम खेळला जातो. एका बॅटलफिल्टमध्ये १०० अनोळखी गेमर्स एका वेळेस हा गेम खेळतात. गेम खेळण्यासाठी दिलेली जागा हळूहळू कमी होत जाते, त्यामुळे एकमेकांना ठार करून शेवटी जिवंत राहणारा या गेममध्ये जिंकतो.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com