जन धन खात्यांवर सरकारची नजर

पीटीआय
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - जन धन योजनेअंतर्गत उघडलेल्या बॅंक खात्यांत असलेल्या शून्य शिल्लकीत अचानक मोठी वाढ होऊ लागली आहे. याची सरकारने दखल घेतली असून, यावर करडी नजर सरकारी यंत्रणांनी ठेवली आहे. पाचशे व हजारच्या नोटा बंद झाल्यानंतर फक्त दोन दिवसांत बॅंकिंग व्यवस्थेत सुमारे दोन लाख कोटी रुपये जमा झाले आहेत.

याबाबत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले, ""पैसा बदलून देणाऱ्या दलालांवर सरकारी यंत्रणांचे लक्ष आहे. बेहिशेबी संपत्ती घेऊन हे दलाल सोने आणि जडजवाहिरांमध्ये गुंतवणूक करीत आहेत. यावर महसूल विभाग आणि सक्त वसुली संचालनालय नजर ठेवून आहे. जन धन योजनेअंतर्गत देशात बॅंक खाती नसलेल्या नागरिकांची बॅंकांमध्ये खाती उघडण्यात आली. ही खाती बहुतांश निष्क्रिय होती. यातील शिल्लक ही शून्य होती. आता या खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा जमा होऊ लागला आहे. अचानक जमा होऊ लागलेल्या मोठ्या रकमेची सरकारने दखल घेतली आहे. सरकारी यंत्रणा यावरल लक्ष ठेवून आहे.''

बंद केलेल्या पाचशे व हजारच्या जुन्या नोटांचा बेकायदा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सरकारी यंत्रणा मागेपुढे पाहणार नाही.
- अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री

Web Title: Public money accounts to monitor government