बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याची बारावी निकालात घसरण

मिलिंद देसाई
सोमवार, 15 एप्रिल 2019

बेळगाव - बारावीच्या निकालात पुन्हा एकदा बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याची घसरण झाली असून सोमवारी पदवीपुर्व शिक्षण खात्याने बारावीचा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये बेळगाव जिल्हा 28 क्रमांकावर घसरला आहे.

बेळगाव - बारावीच्या निकालात पुन्हा एकदा बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याची घसरण झाली असून सोमवारी पदवीपुर्व शिक्षण खात्याने बारावीचा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये बेळगाव जिल्हा 28 क्रमांकावर घसरला आहे.

बेळगाव जिल्ह्यातील 56.28 टक्के विध्यार्थी पास झाले आहेत तर राज्याचा एकूण निकाल 61.73 टक्के लागला आहे. यावेळीही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. 68.2 टक्के विद्यार्थीनी पास झाल्या आहेत. 1 मार्च ते 18 मार्चपर्यंत बारावीची परीक्षा पघेण्यात आली होती. यावेळी 6,71,653 विद्यार्थानी परीक्षा दिली होती यापैकी 223301 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 80353 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत पास झाले आहेत. परीक्षा झाल्यानंतर फक्त 20 दिवसात निकाल जाहीर करण्यात आला आहे  

यावेळी पेपर तपासणी वेळीच गुणांची नोंद केली होती. त्यामुळे निकाल लवकर लागण्यास मदत झाली असुन सोमवारी सकाळपासून च टेंशन, धाकधूक आणि उत्सुकता अशा भावनांच्या परिस्थितीत विद्यार्थाची निकाल पाहण्यासाठी धावपळ सुरू होती. विज्ञान शाखेचे 66.8 टक्के तर वाणिज्य शाखेचे 66.39 विद्यार्थी पास झाले आहेत. आज शिक्षण खात्याच्या संकेतस्थळावर तर मंगळवारी महाविद्यालयात निकाल उपलब्ध होणार आहे.

Web Title: PUC EXam result declared in Karanataka