पुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणांचे अपयश नाही; केंद्राचे स्पष्टीकरण

वृत्तसंस्था
बुधवार, 26 जून 2019

- पुलवामा हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर केले जात होते प्रश्नचिन्ह उपस्थित.

- केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले याबाबतचे स्पष्टीकरण.

नवी दिल्ली : पुलवामा हल्ला हा आपल्या गुप्तचर यंत्रणांचे अपयश नाही, असे स्पष्टीकरण केंद्र सरकारकडून आज (बुधवार) संसदेत देण्यात आले. तसेच सर्व सुरक्षा यंत्रणा हे योग्यरितीने आणि समन्वयाने काम करत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने विशेष काही बाबी असल्याचे त्याची माहिती यंत्रणांमार्फत दिली जाते, असेही सांगण्यात आले. 

केंद्रीय गृह राज्यमंत्री किशन रेड्डी यांनी याबाबतची माहिती संसदेत दिली. ते म्हणाले, जम्मू-काश्मिरच्या सीमारेषेवरील काही भाग दहशतवादपुरस्कृत आहे. यातील काही भागात दहशतवादाला पाठिंबा दिला जात आहे. या सर्व घडामोडी मागील तीन दशकांपासून होत आहे. तसेच ते पुढे म्हणाले, 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशवाद्याकडून आत्मघाती हल्ला घडविण्यात आला होता. यामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाचे 40 जवान हुतात्मा झाले. त्यानंतर या हल्ल्यावरून विरोधकांकडून सत्ताधारी मोदी सरकारसह सुरक्षा यंत्रणांवर संशय व्यक्त केला जात होता.

त्यानंतर आता केंद्र सरकारकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले. यामध्ये पुलवामा हल्ला हा आपल्या गुप्तचर यंत्रणांचे यश नाही, असे सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pulwama Attack Not An Intelligence Failure Government Tells Parliament