पुलवामा हल्ल्यातील संशयिताला बिहारमधून अटक

पीटीआय
रविवार, 3 मार्च 2019

पाटणा : जम्मू-काश्‍मिरातील पुलवामा हल्ल्यामागील एका संशयिताला आज बिहारमध्ये बांकातून अटक करण्यात आली. मोहम्मद रेहान असे त्याचे नाव असून, तो शंभूगंज तालुक्‍यातील बेलारीचा रहिवासी आहे. त्याचा शेजारी दानूस परवेज ऊर्फ नौशाद मात्र पळून गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्याच्या (ता. 3) सभेत कारवाईची या दोघांची योजना असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी भागलपूर जिल्ह्यातील अकबरनगर तालुक्‍यातील इंग्लिश चिचरौन या गावातून रेहानची पत्नी आणि त्याच्या सासूलाही अटक केली. पुलवामा हल्ल्याशी या दोघींचा संबंध असल्याचा संशय आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे (एनडीए) उद्या पाटण्याच्या गांधी मैदानात संकल्प सभा होणार असून, तेथे गडबड करण्यासाठी काही युवकांची तुकडीही तयार करण्यात आली होती. ही माहिती मिळाल्यावर पोलिसांनी छापा गालून रेहानला अटक केली. त्याची पत्नी चिचरौनला पळाली होती; पण पोलिसांनी तिलाही अटक केली.

रेहानला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकाला रहिवाशांच्या विरोधाचा सामना करावा लागला. रेहान गुराखी असून, गावातील मुलांना शिकवण्याचे कामही तो करतो. नौशाद पूर्वी तुरुंगात जाऊन आला आहे. झारखंडातील दुमका येथून मुलींची तस्करी, गुरांची चोरी आणि खोटी प्रमाणपत्रे बनविल्याच्या आरोपांवरून नौशाद तुरुंगात गेला होता. शिवाय त्याने दीड कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप असून, दोन महिन्यांपूर्वीच तो दुमका तुरुंगातून बाहेर आला आहे.

बांकामध्ये होणाऱ्या राजकीय नेत्यांच्या सभांचे व्हिडिओ हे दोघे काश्‍मीरमध्ये पाठवित होते, अशी माहिती मिळाली. त्यांच्या घरात काय सापडले हे समजलेले नाही.

Web Title: Pulwama attack suspect arrested in Bihar