पुलवामामध्ये चकमकीत 1 दहशतवादी ठार; दोघे पळाले

वृत्तसंस्था
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

चकमकीनंतर पळून गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्करे तैयबाचा कमांडर अयूब ललहारी याचाही समावेश आहे. तर दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव रहमान असून, तो पाकिस्तानचा आहे. गेल्या काही दिवसांत सुरक्षा रक्षकांकडून दहशतवाद्यांना ठार मारण्यात येत आहे.

जम्मू - जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील संबुरा येथे रविवारी रात्री दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असून, दोन दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी ठरले.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबुरा भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय रायफल्सचे जवान आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी शोधमोहिम सुरु केली. दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांच्या दिशेने गोळीबार केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देण्यात आले. या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला असून, दोघे जण पळून जाण्यात यशस्वी ठरले. यांचा शोध घेण्यात येत आहे. 

चकमकीनंतर पळून गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्करे तैयबाचा कमांडर अयूब ललहारी याचाही समावेश आहे. तर दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव रहमान असून, तो पाकिस्तानचा आहे. गेल्या काही दिवसांत सुरक्षा रक्षकांकडून दहशतवाद्यांना ठार मारण्यात येत आहे. आतापर्यंत यावर्षी 124 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: Pulwama encounter: One militant killed in fierce gunbattle with security forces in Jammu and Kashmir