Pulwama terror attack: बदला घ्या...

Pulwama terror attack 20 CRPF jawans martyred
Pulwama terror attack 20 CRPF jawans martyred

नवी दिल्लीः जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर आज (गुरुवार) केलेल्या हल्ल्यात 20 जवान हुतात्मा झाले असून, देशभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. या हल्ल्याचा बदला घ्या, अशी मागणी देशवासीय करू लागले आहेत.

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. 2004 नंतर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हा एवढा मोठा हल्ला घडवला आहे. उरीनंतरचा हा भारतावरचा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे.

आदिल अहमद दार उर्फ वकास या दहशतवाद्याने हा हल्ला घडवला. आदिल अहमद हा 2016नंतर दहशतवादी संघटनेत भरती झाला होता. आदिलने स्फोटांनी भरलेली मोटार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेने नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवून आणला.

दहशतवादी हल्ल्यात 20 जवान हुतात्मा झाल्याची बातमी समजल्यानंतर संतापाची लाट उसळली. सोशल मीडियावरही नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. हल्ल्यानंतर काही वेळातच ट्वीटरवर #Pulwama, #CRPF, #KashmirTerrorAttack, #Awantipora, Jammu to Srinagar हे टॉप टेनमध्ये ट्रेण्ड आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com