हुर्रियत नेत्यांना सरकारचा दणका; 18 जणांची सुरक्षा काढली

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर आत्मघाती हल्लेखोरांनी कार धडकावत स्फोट घडवून आणला होता. या स्फोटात 40 जवान हुतात्मा झाले होते. या हल्ल्यानंतर सरकारने हे पाऊल उचलले आहे. सुरक्षेबरोबर सरकारकडून देण्यात आलेल्या गाड्याही काढून घेण्यात आल्या आहेत. 

नवी दिल्ली : भारतीय लष्करावरील पुलवामा येथील आत्मघाती दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने हुर्रियत कॉन्फरन्स या फुटीरतावादी संघटनेच्या आणिखी 18 सदस्यांची सुरक्षा काढून घेतली आहे.

केंद्र सरकारने नुकतेच पुलवामा हल्ल्यानंतर पाच फुटीरतावाद्यांची सुरक्षा काढून घेतली होती. यामध्ये मीरवाईझ उमर फारूख, अब्दुल गनी भट, बिलाल लोन, हशिम कुरेशी आणि शाबीर शहा यांचा समावेश होता. आता सरकारने यांच्यासह अन्य 18 हुर्रियतच्या नेत्यांचीही सुरक्षा काढून घेतली आहे. यामध्ये सईद अली शहा गिलानी, आगा सईद मोसवी, मोहम्मद अब्बास अन्सारी, यासिन मलिक, सलीम गिलानी, शाहिद उल इस्लाम, जफ्फर अकबर भट्ट, नईम अहमद खान, मुख्तार अहमद वाझा, फारख अहमद किचलो, मसरूर अब्बास अन्सारी, आगा सईद अब्दुल हुसैन, अब्दुल गनी शहा आणि मोहम्मद मुसादिक भट्ट यांचा समावेश आहे. 

पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर आत्मघाती हल्लेखोरांनी कार धडकावत स्फोट घडवून आणला होता. या स्फोटात 40 जवान हुतात्मा झाले होते. या हल्ल्यानंतर सरकारने हे पाऊल उचलले आहे. सुरक्षेबरोबर सरकारकडून देण्यात आलेल्या गाड्याही काढून घेण्यात आल्या आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pulwama terror attack Jammu & Kashmir government withdraws security of 18 Hurriyat leaders