हुतात्मा होण्यापूर्वी जवान म्हणाला; माझा मुलगा रडत तर नाही ना...

Pulwama Terror Attack : jawana sukhjinder had asked his brother about well being of family just before attack
Pulwama Terror Attack : jawana sukhjinder had asked his brother about well being of family just before attack

चंदीगडः जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्याने भ्याड हल्ला करण्यापूर्वी जवान सुखजिंदर सिंग यांनी आपल्या भावाला फोन करून अनेकदा माझा मुलगा रडत तर नाही ना... अशी विचारणा केली होती. सुखजिंदर सिंग हे पंजाबमधील तरणतारण येथील गंडीविंड धत्तल गावाचे रहिवासी.

सुखजिंदर सिंग हे 'सीआरपीएफ'च्या 76व्या बटालियनमध्ये कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते. एक महिन्याच्या सुट्टीनंतर ते 28 जानेवारी रोजी पुन्हा आपल्या कर्तव्यावर रूजू झाले होते. कर्तव्य बजावण्यास जाण्यापूर्वी ते वारंवार आपल्या आठ महिन्यांच्या मुलाला जवळ घेऊन अनेकदा मुका घेत होते.

सुखजिंदर सिंग यांनी काल (गुरुवार) सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास भाऊ गुरजंट सिंग जंटा यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला होता. यावेळी ते म्हणाले, 'जम्मू काश्मीरमधील रस्ते काही दिवस बंद असल्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र, दुरुस्तीनंतर येथील रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला आहे.'

सुखजिंदर सिंग फोनवर वारंवार मुलगा गुरजोत सिंगबाबत विचारत होते. माझा मुलगा रडत तर नाहीय ना?, तो ठीक आहे ना?, असे सतत विचारत होते. शिवाय, मुलासाठी भरपूर खेळणी पाठवणार असल्याचेही फोनवरून भावाशी बोलताना सांगत होते.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे गुरुवारी (ता. 14) दहशतवादी हल्ल्याचे वृत्त कुटुंबीयांना समजले आणि यामध्ये सुखजिंदर सिंग हुतात्मा झाल्याचे समजल्यानंतर आमच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. संपूर्ण गाव दुःखात बुडाला आहे, असेही गुरजंट सिंग जंटा यांनी सांगितले.

दरम्यान, आजच्या दिवशी भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती. आमचा मुलगाही देशासाठी हुतात्मा झाला आहे, अशी प्रतिक्रिया हुतात्मा जवान सुखजिंदर सिंग यांच्या कुटुंबियांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com