भारताचे समजून घाबरलेल्या पाकने पाडले स्वःताचे विमान

pakistan army mistakenly shoots down its own aircraft
pakistan army mistakenly shoots down its own aircraft

नवी दिल्लीः जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधले संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. पाकिस्तान अतिषय घाबरलेल्या अवस्थेत असून, पाकिस्तानने भारताचे समजून स्वःताचेच विमान पाडले आहे.

पाकिस्तानने स्वःताचे फायटर विमान पाडल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. शिवाय, सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. परंतु, याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. यामुळे संबंधित वृत्ताची खातरजमा होऊ शकली नाही. मात्र, सोशल नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

पाकिस्तान भारताच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारत कधीही घेऊ शकतो, या विचाराने पाकिस्तान घाबरले आहे. भारताने जर युद्धाचा मार्ग पत्करलाच तर पाकिस्तानही भारताला प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तानने भीतीपोटीच सीमेवर रणगाडे रवाना केले असून, सियालकोट सीमेजवळ मोठ्या प्रमाणात रणगाडे तैनात केले आहेत. सीमेजवळील गावे खाली केली असून, अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. नियंत्रण रेषेजवळील नागरिकांची ये-जा थांबवली आहे. रात्रीच्या वेळी गरज नसल्यास विजेचे दिवे लावू नका, असे निर्देश पाकिस्तान सरकारने नागरिकांना दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com