पाकिस्तानी नागरिकांनो 48 तासात चालते व्हा...

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

बीकानेरः पाकिस्तानी नागरिकांनो 48 तासांमध्ये चालते व्हा, असे बीकानेरचे जिल्हाधिकारी कुमार पाल गौतम यांनी पाकिस्तानी नागरिकांना सांगितले आहे.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील पिंगलान भागात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एका मेजरसह पाच जवान हुतात्मा झाले. यामध्ये राजस्थानमधील एस. राम यांचा समावेश आहे. यानंतर राजस्थानातील बीकानेरचे जिल्हाधिकारी कुमार पाल गौतम यांनी पाकिस्तानी नागरिकांची एक यादी जारी केली. शिवाय, त्यांनी सीआरपीसी 144 कलम लागू केल्याची माहिती दिली आहे.

बीकानेरच्या जिल्ह्याधिकारी कुमार पाल गौतम यांनी म्हटले आहे की, 'पाकिस्तानी नागरिकांनी 48 तासांच्या आत जिल्हा सोडावा. बीकानेर हद्दीतील हॉटेलवाल्यांना पाकिस्तानी नागरिकांना आश्रय देण्यावरही प्रतिबंध आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन महिन्यांसाठी हे आदेश लागू केले आहेत.'

दरम्यान, पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर सोमवारी (ता. 18) आणखी चार भारतीय जवानांना हुतात्मा करणाऱ्या दहशतवाद्यांचा भारतीय लष्कराने खात्मा केला. दहशतवादी लपलेले घरच लष्कराने उडवून देत नया हिंदुस्तानची झलक दाखविली आहे. भारतीय जवानांनी पुलवामा हल्ल्याचा बदला घेत जैशे महंमदचा म्होरक्या अब्दुल रशीद गाझी याच्यासह दोन दहशतवाद्यांना ठार केले.

पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर केलेल्या गोळीबारात मेजरसह चार जवान हुतात्मा झाले आहेत. तर, या हल्ल्यात एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. पिंगलान भागात रविवारी मध्यरात्रीपासून दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक सुरु होती. पिंगलान भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी शोधमोहिम राबविली असता दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर गोळीबार केला. या गोळीबारात एका मेजरसह तीन जवान हुतात्मा झाले. तर, एका नागरिकाचाही म़ृत्यू झाला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pulwama Terror Attack : Pakistani nationals in Bikaner asked to leave the district within 48 hours