Pulwama Terror Attack: 'पण' बदला घ्या...

Pulwama terror attack ready to give another son for mother india says matryr ratan thakur father
Pulwama terror attack ready to give another son for mother india says matryr ratan thakur father

नवी दिल्लीः भारतमातेच्या सेवेसाठी मी माझ्या मुलाचं बलिदान दिले असून, दुसऱ्या मुलालाही मी सीमारेषेवर पाठवणार आहे. माझा दुसरा मुलगाही भारतमातेसाठी देण्यास तयार आहे, पण पाकिस्तानला योग्य उत्तर दिले गेले पाहिजे, अशी प्रतिक्रिया पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) जवान रतन ठाकूर यांच्या वडिलांनी दिली आहे.

पुलवामा येथे गुरुवारी (ता. 14) दुपारी तीनच्या सुमारास झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान हुतात्मा झाले आहेत. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या 'सीआरपीएफ'च्या ताफ्यावर हा भ्याड हल्ला झाला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. अवंतीपुरा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून, हुतात्मा वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

हल्ल्यात हुतात्मा झालेले 'सीआरपीएफ'चे जवान रतन ठाकूर हे बिहारमधील भागलपूरचे होते. रतन ठाकूर यांच्या वडिलांनी म्हटले आहे की, 'पाकिस्तानला योग्य उत्तर दिले पाहिजे. भारतमातेच्या सेवेसाठी मी माझ्या मुलाचं बलिदान दिले आहे. माझ्या दुसऱ्या मुलालाही मी सीमारेषेवर पाठवणार आहे. माझा दुसऱा मुलगाही भारतमातेसाठी देण्यास तयार आहे, पण पाकिस्तानला योग्य उत्तर दिले गेले पाहिजे. पाकिस्तानला धडा शिकवा’.

जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याने देशभर संतापाची लाट उसळली आहे. या जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असा गर्भित इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. आदिल दार असे आत्मघातकी हल्ला चढविणाऱ्या अतिरेक्याचे नाव आहे. तो दक्षिण काश्मीरमधील काकेपुराचा आहे. 2018 मध्ये तो जैश-ए-महम्मदमध्ये सामील झाला होता. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com