Pulwama Terror Attack ः तीन महिन्यांच्या मुलीचा चेहरा पाहण्याआधीच वीरमरण

वृत्तसंस्था
शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019

जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात 'जैश-ए-महंमद' या दहशतवादी संघटनेने केलेल्या नृशंस हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 44 जवान हुतात्मा झाले आहे. रोहिताश लांबा हे यामध्ये हुतात्मा झालेले एक जवान. त्यांना तीन महिन्यापूर्वी एक मुलगी झाली होती. मुलीला पाहण्यासाठी रोहिताश होळीला घरी येणार होते. मात्र त्याआधीच काळाने त्यांच्यावर आघात केला. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच फक्त लांबा कुटुंबीयच नाही तर त्यांच्या पूर्ण गावावर शोककळा पसरली.

श्रीनगर- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात 'जैश-ए-महंमद' या दहशतवादी संघटनेने केलेल्या नृशंस हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 44 जवान हुतात्मा झाले आहे. रोहिताश लांबा हे यामध्ये हुतात्मा झालेले एक जवान. त्यांना तीन महिन्यापूर्वी एक मुलगी झाली होती. मुलीला पाहण्यासाठी रोहिताश होळीला घरी येणार होते. मात्र त्याआधीच काळाने त्यांच्यावर आघात केला. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच फक्त लांबा कुटुंबीयच नाही तर त्यांच्या पूर्ण गावावर शोककळा पसरली.

घरात सर्व काही नेहमीप्रमाणे सुरू होतं. पण तेव्हाच श्रीनगरवरून आलेल्या एका फोनने लांबा कुटुंबियांचं आयुष्यच बदलून गेलं. सीआरपीएफच्या प्रमुखांनी फोनवरून रोहिताश यांना वीरमरण आल्याचं सांगितलं. त्या एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. गावातील इतरांना जेव्हा ही बातमी कळली तेव्हा सारेच शोकाकूल झाले. पूर्ण गाव रात्रभर जागलं. जम्मू- काश्मीर येथील पुलवामामध्ये गुरुवारी दुपारी भारतीय जवानांच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला केला. या हल्ल्यात 44 जवान शहीद झाले आहेत.

या हल्ल्यात रोहिताश लांबा यांना वीरमरण आल्याने त्यांना तीन महिन्यांच्या मुलीचा चेहराही पाहता आला नाही. गावातील लोकांना जेव्हा ही बातमी कळाली तेव्हा सर्वानीच खूप हळहल व्यक्त केली. एका क्षणात होत्याचे नव्हते झाली अशी भावना गावकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. रोहिताश लांबा हे 76 बटालियनचे जवान होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pulwama terror attack shahid rohitash lamba died could not see his new born daughter