जर हिंमत असेल, तर जाहीर फाशी द्या: सिद्धू

वृत्तसंस्था
सोमवार, 18 फेब्रुवारी 2019

नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे असलेल्या प्रत्येकाला शिक्षा मिळायलाच हवी. तुमच्यात जर हिंमत असेल, तर हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना देशात घेऊन या आणि त्यांना जाहीर फाशी द्या, असे काँग्रेस नेते नवजोत सिंग सिद्धू यांनी म्हटले आहे.

नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे असलेल्या प्रत्येकाला शिक्षा मिळायलाच हवी. तुमच्यात जर हिंमत असेल, तर हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना देशात घेऊन या आणि त्यांना जाहीर फाशी द्या, असे काँग्रेस नेते नवजोत सिंग सिद्धू यांनी म्हटले आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना सिद्धू म्हणाले, 'पुलवामा हल्ल्यामागे काही मोजकी माणसं आहेत. त्यांनी केलेल्या कृत्यांची शिक्षा त्यांना मिळायलाच हवी, यावर मी ठाम आहे. परंतु, सामान्य माणसाला, निष्पाप महिलांना, लहानग्यांना मिळू नये, असे मला वाटते. कारण अशी कृती शिख गुरुंच्या आणि मानवतेच्याही विरोधातली आहे. तुमच्यात जर हिंमत असेल, तर हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना देशात घेऊन या आणि त्यांना जाहीर फाशी द्या. भारताने शांततेसाठी खूप प्रयत्न केले आहेत. काही प्रवृत्तींमुळे या प्रयत्नांना धक्का पोहोचू नये.' पुलवामा हल्ल्यानंतर काही मोजक्या लोकांमुळे एका देशाला दोषी धरता येणार नाही, असे सिद्धू यांनी म्हटले होते. सिद्धू यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर देशभरातून टीका झाली होती.

1999 मध्ये कंदहार विमान अपहरण प्रकरण घडलं होतं. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी अजहरची सुटका केली होती. 20 वर्षांपूर्वी घडलेल्या त्या घटनेचा संदर्भ देताना व भाजपवर टीका करताना सिद्धू म्हणाले, 'भाजपवर टीका करताना सिद्धू म्हणाले, 'पुलवामात दहशतवादी हल्ला घडवणाऱ्या मसूद अजहरची 20 वर्षांपूर्वी कोणी सुटका केली? आज जे मला देशद्रोही म्हणत आहेत, त्या लोकांनीच अजहरची सुटका केली आणि त्याला पाकिस्तानला पाठवले. त्यानंतर इतकी वर्ष त्याला अटक करुन देशात आणण्यासाठी त्यांनी काय केलं?'

'राष्ट्रवाद हाच सर्वात मोठा धर्म आहे आणि मी माझ्या देशासोबत आहे. पुलवामा हल्ल्यानंतर ज्या भावना देशवासीयांच्या मनात आहेत, त्याच माझ्या मनात आहेत. देशाचा आवाज हाच माझाही आवाज आहे. मी माझ्या पक्षाच्या भूमिकेशी पूर्णपणे सहमत आहे,' असेही सिद्धू म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pulwama terror attack: Who released Masood Azhar in 1999 in Kandahar asks Navjot Singh Sidhu