'बिग बॉस'मध्ये दिसणार महाराष्ट्रातील भाजपचा 'हा' मोठा नेता?

वृत्तसंस्था
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

बिग बॉसमधील वादग्रस्त टास्कबद्दल हा शो खूप चर्चेत आहे. बेड शेअरिंग टास्कमधून धार्मिक भावना दुखावल्याचाही आरोप या शोवर करण्यात येत आहे. त्यामुळे नुकतेच सोशल मीडियात या शोवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. आता पुन्हा एकदा हा शो चर्चेत येण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या लोकप्रिय टिव्हि शोमध्ये महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर दिसले तर आश्चर्य वाटायला नको. कारण, त्यांना बिग बॉसबाबत पत्र आले असून, अद्याप त्यांनी ते पाहिले नसल्याने त्यांच्या बिग बॉसमध्ये समावेशबाबत असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

बिग बॉसमधील वादग्रस्त टास्कबद्दल हा शो खूप चर्चेत आहे. बेड शेअरिंग टास्कमधून धार्मिक भावना दुखावल्याचाही आरोप या शोवर करण्यात येत आहे. त्यामुळे नुकतेच सोशल मीडियात या शोवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. आता पुन्हा एकदा हा शो चर्चेत येण्याची शक्यता आहे. कारण, भाजपचा मोठा नेता या मध्ये सहभागी होण्याची चर्चा सुरु झाल्या आहेत. 

प्रकाश जावडेकर यांना शनिवारी पत्रकार परिषदेत बिग बॉसबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, की बिग बॉसबाबत माझ्याकडे पत्र आले आहे. पण मी ते अद्याप पाहिलेले नाही. ते पाहून मी निर्णय घेतो. 

त्यांच्या या उत्तरानंतर अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. पुढील मोसमात त्यांना सहभागी होण्यासाठी तर हे पत्र आले आहे का, असा प्रश्न पडला आहे. तर, जावडेकर यांच्याकडे माहिती व प्रसारण मंत्रालय असल्याने बिग बॉसवर बंदी घालण्यासाठी हे पत्र असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या पत्रात काय आहे, याचा खुलासा झाला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune BJPs leader receives letter for Salman Khans Big Boss show