दूधसागर धबधब्यात पुण्यातील तरुणी वाहून गेली

Pune girl drown in Dudhsagar waterfall
Pune girl drown in Dudhsagar waterfall

गोवा : गोव्यातील प्रसिद्ध कुळे येथील दूधसागर धबधबा पर्यटनासाठी पुण्याहून आलेल्या 13 जणांच्या गटातील एक तरुणी दूधसागर नदीत पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्याची घटना आज सकाळी आठच्या सुमारास घडली. वाहून गेलेल्या तरुणीचे नाव सुहागता बासू (25) ही मूळ पश्चिम बंगालची असून तिच्याबरोबर असलेल्या गटातील काही तरुण-तरुणी हे पुणे येथील आहेत. 

आज सकाळी निझामुद्दिन रेल्वेने हा तेरा जणांचा गट पहाटे पावणेपाच च्या सुमारास कुळे येथील सोनावली रेल्वे स्थानकावर उतरला. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना सोनावली येथे उतरून दूधसागर धबाधबा येथे जाण्यास असलेली वाट धोक्याची असल्याची सूचना दिली होती. तरीही हा गट सोनावली येथे उतरला. 

गोव्यात पाऊस जोरात सुरू असल्याने धबधब्याकडे जाताना अनेक लहान ओहोळ असून ते पाण्याणे तुडुंब भरले आहेत. या ओहोळात हा गट एकमेंकाचा हात धरून जात असताना सुहागता हिचा धरलेला हात सुटला व ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेली. दुपारपर्यंत तिचा शोध लागला नव्हता. कुळे पोलिसांनी याप्रकरणी शोधमोहीम सुरू केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com