राहण्यासाठी 'पुणे' देशात अव्वल 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

या शहरांचा नकार 
पश्‍चिम बंगालमधील हावडा, न्यू टाउन कोलकाता आणि दुर्गापूर या शहरांनी या पाहणीत सहभागी होण्यास नकार दर्शविला, तर नवीन रायपूर आणि अमरावती (आंध्र प्रदेश) ही शहरे या सर्वेक्षणाच्या निकषात बसू शकली नाहीत, अशी माहितीही पुरी यांनी दिली. 

नवी दिल्ली : विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्याच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाने आज देशात राहण्यासाठी सर्वात उत्तम अशा शहरांची यादी जाहीर केली असून, त्यात पुणे शहराने अव्वल स्थान पटकाविले आहे. पुण्यापाठोपाठ मुंबई या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री हरदीप पुरी यांनी आज "इज ऑफ लिव्हिंग इन्डेक्‍स'मध्ये स्थान मिळविलेल्या शहरांची यादी प्रसिद्ध केली. यात पुणे शहराला सर्वाधिक पसंती दिली असून, त्यापाठोपाठ महाराष्ट्रातील मुंबई व ग्रेटर मुंबई या शहरांची वर्णी लागली आहे. प्रदूषणाच्या वाढत्या समस्येमुळे देशाची राजधानी दिल्लीचे स्थान मात्र या यादीत खूप खाली घसरले असून, दिल्ली या यादीत 65 व्या क्रमांकावर आहे. 

शहरांची निवड करताना प्रामुख्याने प्रशासन, सामाजिक संस्था, आर्थिक आणि भौतिक पायाभूत सुविधा हे चार निकष विचारात घेतले असून, त्यानुसार 111 शहरांची पाहणी करण्यात आल्याची माहिती पुरी यांनी या वेळी दिली. 

उत्तर प्रदेशच्या पदरी निराशा 
आज प्रसिद्ध झालेल्या यादीत देशातील सर्वांत मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमधील एकाही शहराला पहिल्या 10 मध्ये स्थान मिळविता आले नसल्याचे स्पष्ट झाले. राज्यातील रामपूर हे शहर या यादीत सर्वांत खालच्या स्थानावर आहे. 

या शहरांचा नकार 
पश्‍चिम बंगालमधील हावडा, न्यू टाउन कोलकाता आणि दुर्गापूर या शहरांनी या पाहणीत सहभागी होण्यास नकार दर्शविला, तर नवीन रायपूर आणि अमरावती (आंध्र प्रदेश) ही शहरे या सर्वेक्षणाच्या निकषात बसू शकली नाहीत, अशी माहितीही पुरी यांनी दिली. 

"टॉप टेन' शहरे 
1 - पुणे 
2 - नवी मुंबई 
3 - ग्रेटर मुंबई 
4 - तिरुपती 
5 - चंदीगड 
6 - ठाणे 
7 - रायपूर 
8 - इंदूर 
9 - विजयवाडा 
10 - भोपाळ 

Web Title: Pune ranked one on Ease of Living Index