पंजाबच्या भाजप प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 जानेवारी 2017

यापूर्वी लुधियानातील भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी राज्यमंत्री सतपाल गोसेन यांनी काही नेते व हजारो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

चंदीगड - तिकीट वाटपावरून नाराजी दर्शवत पंजाबचे भाजप प्रदेशाध्यक्ष विजय सांपला यांनी आपल्या पदाचा राजानीमा दिला. त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे पाठविला असून, यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे.

सत्ताधारी भाजप आणि शिरोमणी अकाली दल यांना पंजाबमध्ये काँग्रेस आणि आपकडून जोरदार टक्कर मिळण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच मंत्री असलेले प्रदेशाध्यक्ष विजय सांपला यांनी राजीनामा दिला आहे.फगवारा मतदारसंघातून भाजपने सोम प्रकाश यांना उमेदवारी दिल्याने ते नाराज आहेत. ते या मतदारसंघातून आपल्या आवडीचा उमेदवार देणार होते. 

यापूर्वी लुधियानातील भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी राज्यमंत्री सतपाल गोसेन यांनी काही नेते व हजारो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. नवज्योसिंग सिद्धूनेही काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने येथे काँग्रेसची ताकद वाढली आहे.

Web Title: Punjab BJP chief Vijay Sampla resign