पंजाबमधूनच होणार काँग्रेसचा पुनर्जन्म : सिद्धू

टीम ई सकाळ
शनिवार, 11 मार्च 2017

अमृतसर : ''पंजाबमधून काँग्रेस पुन्हा उभारी घेईल. पंजाबमधील हा विजय आमच्या सर्वांतर्फे राहुल गांधींना भेट आहे,'' अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी व्यक्त केली. 

पंजाब विधानसभा निवडणुकीत शिरोमणी अकाली दल-भाजप युतीला मागे टाकुन काँग्रेस बहुमताचा आकडा पार करेल असे दिसल्यानंतर ही पत्रकार परिषद घेण्यात आली.

पंजाबच्या जनतेने आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू व यापुढे कोणताही भेदभाव मनात न ठेवता पंजाबच्या विकासासाठी सर्वांना एकत्र घेऊन काम करु; तसेच कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्त्वाखाली पंजाबला विकासाकडे घेउन जाऊ असे सिद्धू म्हणाले.

पंजाबमधील गुन्हेगारी संपवण्यासाठी कठोर कायदा बनवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Punjab election Navjot Singh Sidhu Congress Rahul Gandhi