पंजाब गारठलेले; काश्‍मीरला दिलासा

पीटीआय
सोमवार, 21 जानेवारी 2019

श्रीनगर/चंडीगड : पंजाब आणि हरियानातील बहुतांश भागात रविवारी थंडी होती. दरम्यान, जम्मू-काश्‍मीरच्या नागरिकांना आज थंडीपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला. राज्यात अनेक भागांत ढगाळ वातावरण असल्याने वातावरणात गारठा कमी राहिला. 

पंजाबमध्ये गुरुदासपूर येथे किमान तापमान 3.3 अंश सेल्सिअस नीचांकी तापमान नोंदले गेले. राजधानी चंडीगड येथे किमान तापमान 10.6 अंश सेल्सिअस इतके होते. पंजाबमध्ये पठाणकोट, आदमपूर, हलवाडा, बठिंडा आणि फरिदकोट येथे किमान तापमान अनुक्रमे 8.9,10.7, 8.7, 9.5 आणि 8 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. हरियानाच्या अंबाला, हिसार, कर्नाल येथे किमान तापमान 10.7, 8.7, 9.5 आणि 8 अंश सेल्अिस नोंदले गेले. 

काश्‍मीर खोऱ्यात सध्या "चिल्लई कल्हन' सुरू असून खोऱ्यात थंडीची लाट आहे. आज सकाळी काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी शनिवारची रात्र ही नीचांकी तापमानाचीच होती. काश्‍मीरची राजधानी श्रीनगर येथे शनिवारी रात्री उणे 0.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. काझीगुंड येथे 0.4 अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली. लेहमध्ये सर्वांत नीचांकी उणे 9.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

द्रास भागात हेच तापान उणे 12.8 अंश सेल्सिअस इतके होते. काश्‍मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गुलमर्ग येथे उणे 4.6 अंश सेल्सिअस तापमान होते. 

Web Title: Punjab Huge Cold Kashmir Normal