Amritpal Singh : केवळ १०० रुपयांत तो झाला फरार; मदत करणाऱ्यालाही कळू दिलं नाही!

या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे.
Amritpal Singh News
Amritpal Singh NewsSakal

जलंधरमधील एक खेडेगाव शेखूपूरमधून एक फोटो आणि सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. यामध्ये फरार आरोपी खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंह आपल्या एका साथीदारासह जुगाड गाडीवर प्लॅटिना बाईकसह जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी ही गाडीही शोधून काढली आहे.

या जुगाड गाडीच्या चालकाचं नाव लखबीर सिंह लक्खा असं आहे. लक्खाने माध्यमांशी बोलताना सांगितलं की तो आपल्या घरातून मेहतपूरच्या दिशेने चालला होता तेवढ्यात रस्त्यात दोन तरुण त्याला दिसले. त्यांनी लक्खाला रोखलं आणि आपली गाडी पंक्चर झाल्याचं सांगितलं. तसंच आपल्याला सोडण्याची विनंतीही केली. त्यानंतर लक्खाने त्या दोघांना आपल्या गाडीवर बसवून मेहतपूरपर्यंत सोडलं.

Amritpal Singh News
Amritpal Singh : त्याने विवाहित अविवाहित कोणालाच सोडलं नाही; अनेकींशी अफेअर, व्हिडीओवरुन...

लक्खाने सांगितलं की, आपल्याला मदत मागणारी व्यक्ती अमृतपाल सिंह आणि त्याचा सहकारी आहे हे आपल्याला माहित नव्हतं. पण नंतर कळलं की अमृतपालने फरार होण्यासाठी आपल्या गाडीचा वापर केला आहे. तो पुढे म्हणाला की, येता जाता रस्त्यावर पोलिसांच्या बऱ्याच गाड्या होत्या, पण पोलिसांनी तपासणी केली नाही. त्यानंतर अमृतपाल सिंहने गाडीचं भाडं म्हणून १०० रुपयेही दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com