"इन्स्टाग्राम'वरून आत्महत्येचे थेट प्रक्षेपण करत तरुणीने घेतला गळफास

वृत्तसंस्था
रविवार, 19 ऑगस्ट 2018

प्रियकराने धोका दिल्यामुळे आलेल्या नैराश्‍यातून 18 वर्षांच्या तरुणीने आत्महत्या करत त्याचे सोशल मीडियावरून थेट प्रक्षेपण केल्याची खळबळजनक घटना येथे गुरुवारी घडली. पोलिसांनी आज याबाबत माहिती दिली. प्रियकराच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असल्याचेही पोलिसांनी सांगितले. 
 

फगवाडा (पंजाब)- प्रियकराने धोका दिल्यामुळे आलेल्या नैराश्‍यातून 18 वर्षांच्या तरुणीने आत्महत्या करत त्याचे सोशल मीडियावरून थेट प्रक्षेपण केल्याची खळबळजनक घटना येथे गुरुवारी घडली. पोलिसांनी आज याबाबत माहिती दिली. प्रियकराच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असल्याचेही पोलिसांनी सांगितले. 

आत्महत्या केलेली तरुणी येथील होशियारपूर भागात भाड्याच्या घरात राहात होती. संबंधित तरुणीने गुरुवारी रात्री घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. तसेच या आत्महत्येचे इंस्टाग्राम या सोशल मीडिया संकेतस्थळावरून थेट प्रक्षेपणही केले. तरुणीच्या खोलीमध्ये आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली असून, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

इंदर असे आत्महत्या केलेल्या तरुणीच्या प्रियकराचे नाव आहे. प्रेमाला नकार देत धोका दिल्यामुळे आपण आत्महत्या करत आहोत, असे तरुणीने चिठ्ठीत लिहिले आहे, असे पोलिसांनी सांगितले. 

आत्महत्या केलेली तरुणी सध्या नोकरीच्या शोधात होती. तिच्या आईचे काही काळापूर्वीच निधन झाले आहे. या तरुणीचे वडील अनिवासी भारतीय असून, ते सध्या फ्रान्समध्ये वास्तव्याला असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

Web Title: Punjab Teen Spurned By Lover Live Streams Suicide On Instagram