पंजाबी गायक परमिश वर्मा यांच्यावर गोळीबार ; प्रकृती स्थिर

वृत्तसंस्था
शनिवार, 14 एप्रिल 2018

प्रसिद्ध पंजाबी गायक परमिश वर्मा यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. या अज्ञातांनी सेक्टर 91 मध्ये मोहाली येथे शुक्रवारी रात्री गोळीबार केला.

मोहाली : प्रसिद्ध पंजाबी गायक परमिश वर्मा यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. या अज्ञातांनी सेक्टर 91 मध्ये मोहाली येथे शुक्रवारी रात्री गोळीबार केला. या गोळीबारात वर्मा यांच्या मांडीला गोळी लागली असून, या गोळीबारानंतर वर्माला फोर्टिस रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. वर्मा यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

Shooting

गँगस्टर दिलप्रित सिंग याने हा गोळीबार केल्याचे सांगत दिलप्रितने या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली. दिलप्रित हा कुख्यात गुन्हेगार असून, त्याच्यावर अनेक हत्या आणि हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच पोलिसांनी दिलप्रितचा शोध सेक्टर 38 च्या चंदीगड गुरुद्वारामध्ये घेतला. याबाबत मोहालीचे विशेष पोलिस अधीक्षक कुलदीप सिंग चहल याने सांगितले, की ''आम्ही याप्रकरणाचा तपास करत आहोत. तसेच या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून, जिल्हा पोलिसांच्या सायबर तज्ज्ञांकडून याबाबत तपास सुरु करण्यात आला आहे. 

Web Title: Punjabi singer Parmish Verma shot at in Mohali Gangster takes credit for attack Verma Stable