सुप्रसिद्ध सुफी गायक प्यारेलाल वडाली यांचे निधन

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 मार्च 2018

वडाली बंधु हे मूळचे अमृतसरजवळील एका छोट्या गावामधील असून जालंधरमधील हरबल्लाह मंदिरामधील कार्यक्रमापासून त्यांनी त्यांच्या यशस्वी कारकिर्दीची सुरुवात केली. पारंपारिक गायनाखेरीज वडाली बंधुंनी हिंदी चित्रपटसृष्टीसाठीही पार्श्‍वगायन केले आहे

अमृतसर - सुप्रसिद्ध सुफी गायक उस्ताद प्यारेलाल वडाली (वय 75) यांचे आज (शुक्रवार) अम्रतसरमधील खासगी रुग्णालयात निधन झाले.

प्यारेलाल व त्यांचे ज्येष्ठ बंधु उस्ताद पुरण चंद वडाली भारतीय संगीत क्षेत्रातील विख्यात जोडी आहे. काफियां, गझल आणि भजन असे विविध संगीत प्रकार लीलया गाण्यात वडाली बंधुंचा हातखंडा होता. विशेषत: पंजाबी सुफी संगीत गायनामध्ये वडाली बंधुंनी अत्यंत आदराचे स्थान मिळविले होते.

वडाली बंधु हे मूळचे अमृतसरजवळील एका छोट्या गावामधील असून जालंधरमधील हरबल्लाह मंदिरामधील कार्यक्रमापासून त्यांनी त्यांच्या यशस्वी कारकिर्दीची सुरुवात केली. पारंपारिक गायनाखेरीज वडाली बंधुंनी हिंदी चित्रपटसृष्टीसाठीही पार्श्‍वगायन केले आहे.

Web Title: Pyarelal Wadali death sufi music