बाराव्या दिवशीही रांगा कायम 

वृत्तसंस्था
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

केंद्र सरकारच्या नोटाबंदीमुळे मला कसलाही त्रास झालेला नाही. उलट माझे पैसे बॅंकेमध्ये सुरक्षित आहेत. मी सध्या धनादेशांच्या माध्यमातूनच सगळे व्यवहार करतो आहे. 
- आमीर खान, सिनेअभिनेता 

नवी दिल्ली-  केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयास बारा दिवस उलटून गेल्यानंतरही देशातील आर्थिक परिस्थिती सुधारलेली नसून, सामान्य माणसाचा आजचा रविवार देखील बॅंका आणि 'एटीएम'समोरील रांगांमध्ये गेला. अनेक ठिकाणांवर 'एटीएम'मधील पैसे संपल्याने लोकांना रिकाम्या हातानेच घरी परतावे लागले. या नोटाबंदीबाबत राजकीय पक्ष देखील आक्रमक झाले असून, तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याच मुद्द्यावरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. अन्य विरोधी पक्ष देखील याच मुद्द्यावरून आक्रमक झाल्याने सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. 

केंद्र सरकारच्या नोटाबंदीमुळे मला कसलाही त्रास झालेला नाही. उलट माझे पैसे बॅंकेमध्ये सुरक्षित आहेत. मी सध्या धनादेशांच्या माध्यमातूनच सगळे व्यवहार करतो आहे. 
- आमीर खान, सिनेअभिनेता 

झारखंडमध्ये 93 लाख जप्त 
राज्यामध्ये पोलिसांनी आज तीन विविध ठिकाणांवर टाकलेल्या छाप्यांतून 93 लाखांची रोकड जप्त करण्यात आली. दुमका येथील पोस्ट कार्यालयामध्ये कोणीतरी एक कोटी रुपये जमा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. येथील एलआयसी कॉलनीतून पोलिसांनी विनयकुमार यांच्या घरातून 45 लाख रुपये जप्त केले, तर सनील पटवारी आणि सिबू पटवारी या दोघा भावांच्या घरातून अनुक्रमे 16.5 लाख आणि 31.5 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. 

Web Title: queue for note exchange continues on 12th day