अॅसिड हल्ला पीडितांना मिळणार नोकरीत आरक्षण

वृत्तसंस्था
सोमवार, 29 जानेवारी 2018

नवी दिल्ली - मानसिक आजार, बौद्धिक अक्षमता असणाऱ्या व्यक्तिंचा तसेच अॅसिड हल्ल्यातील पीडित महिलांचा केंद्र सरकारने विशेष प्रवर्गात समावेश केला असून, यांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्यात येणार आहे.

नवी दिल्ली - मानसिक आजार, बौद्धिक अक्षमता असणाऱ्या व्यक्तिंचा तसेच अॅसिड हल्ल्यातील पीडित महिलांचा केंद्र सरकारने विशेष प्रवर्गात समावेश केला असून, यांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्यात येणार आहे.

कार्मिक व प्रशिक्षण विभागाने केंद्र सरकारअंतर्गत येणाऱ्या सर्व विभागांना पत्रक असून, यामध्ये अपंग प्रवर्गातील बदलांबाबत माहिती देण्यात आली आहे. 40 टक्के पेक्षा अधिक अपंगत्व असणाऱ्यांसाठी नव्या नियमानुसार, थेट भरतीद्वारे भरावयाच्या पदांमध्ये चार टक्के आरक्षण दिले जाणार आहे. यातील एक टक्के जागा अंध व्यक्ती, मुकबधीर, सेरेब्रल पाल्सी, कुष्ठरोग, अॅसिड हल्ला पीडितांसाठी राखीव असेल. तर बौद्धिक अक्षमता, ऑटिझम, अध्ययन अक्षमता आणि मानसिक आजार असलेल्यांसाठी एक टक्के जागा आरक्षित असेल.

याशिवाय तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक अधिकारी नियुक्त करण्यात येणार असून, तक्रार दाखल केल्याच्या दोन महिन्यांमध्ये तक्रारीचे निवारण करावे, असे या पत्रकात म्हटले आहे.

Web Title: Quota For Acid Attack Survivors, People With Disability In Government Jobs