#MeToo : आमचं मनोरंजन क्षेत्र स्वच्छ असायला हवं... - रहमान

rahman
rahman

गेले अनेक दिवस #MeToo मोहिमेवर चर्चा सुरू असताना, आता प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांनी 'मी टू'वर भाष्य केले आहे. 'गेल्या काही दिवसांपासून माझे मी टू मोहिमेकडे लक्ष होते. यातील काही दिग्गज नावे वाचून मलाही धक्का बसला. आमचं मनोरंजन क्षेत्र हे स्वच्छ असायला पाहिजे. तसंच या क्षेत्रात मुलींचा आदर ठेवला गेला तर ते मला नक्कीच आवडेल,' असे ए. आर. रेहमान यांनी ट्विटरद्वारे म्हणले आहे. 

'पीडित व अत्याचार करणारा या दोघांचीही नावे वाचून मला धक्का बसला. आमचं मनोरंजन क्षेत्र हे स्वच्छच असायला हवे. मी व माझे सहकारी सर्वांना सुरक्षित वाटेल असे वातावरण व काम करण्यासाठी हवा असलेले वातावरण नक्कीच देऊ, जेणेकरून ते उत्कृष्ठ काम करू शकतील.' असेही त्यांनी ट्विट मध्ये म्हणले आहे. तसेच सोशल मीडिया हे सर्वांना व्यक्त होण्यासाठी एक उत्तम माध्यम निर्माण झाले आहे, पण त्याचा गैरवापर होता कामा नये, असेही त्यांनी या पोस्टमध्ये म्हणले आहे. 

अभिनेत्री तनुश्री दत्ताने प्रथम नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप करत #MeToo मोहिमेला वाचा फोडली होती. यानंतर विविध महिलांनी अभिनेते आलोकनाथ, संगीतकार अनु मलिक, गायक कैलाश खेर, दिग्दर्शक साजिद खान, विकास बहल अशा नामांकीत मंडळींवर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com