राबडीदेवींची नितीशकुमारांवर अश्‍लाघ्य भाषेत टीका

उज्ज्वल कुमार : सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

पाटणा : नोटाबंदीमुळे सगळीकडेच टीकांचे वातावरण असताना आज माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी मुख्यमंत्री नितीशकुमारांवर केलेल्या अश्‍लाघ्य भाषेतील टीकेमुळे बिहारचे राजकारण चांगलेच तापलेले दिसले.

बिहार विधान परिषदेबाहेर पत्रकारांशी बोलताना भाजपचे वरिष्ठ नेते सुशील मोदी यांनी आता नितीशकुमारांनी लालू प्रसाद यादव आणि कॉंग्रेसची साथ सोडली पाहिजे असे विधान केले होते, त्यानंतर राबडीदेवींनी ही टीका केल्याचे समजते.

सुशील मोदी म्हणाले की, नितीशकुमारांनी असे केल्यास भाजप त्यांना समर्थन देण्याबाबत पुनर्विचार करेल. तसेच लालू आणि कॉंग्रेसमुळे नितीश यांना त्यांचे सरकार चालविता येत नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. याचवेळी राबडीदेवीदेखील त्यांच्या चेंबरमधून बाहेर आल्या आणि त्यांनी भाजपविरुद्ध बोलण्यास सुरवात केली. त्यांनी अश्‍लाघ्य भाषेत छापता येणार नाही अशी टीका केल्यानंतर ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली. नितीशकुमारांना याबाबत कळल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरही तणाव दिसून आला. त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप न करता पाच मिनिटांत येतो असे म्हणत विधानसभा सोडणेच पसंत केले. पाच मिनिटांत येतो म्हणलेले नितीशकुमार बराच वेळ विधानसभेकडे फिरकले नाहीत.

Web Title: rabri devi calls nitish kumar names