मला केस ओढून मारले; ऐश्वर्या रायचा सासूवर आरोप

वृत्तसेवा
सोमवार, 16 डिसेंबर 2019

मला केस ओढून मारले असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या सूनबाई ऐश्वर्या राय यांनी केला आहे. पाटण्यातील त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठे नाटय घडले असून राबडी देवी यांच्यावर सूनेने मारहाणीचा आणि जबरदस्तीने बंगल्याबाहेर काढल्याचा आरोप केला आहे.

पटना : मला केस ओढून मारले असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या सूनबाई ऐश्वर्या राय यांनी केला आहे. पाटण्यातील त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठे नाटय घडले असून राबडी देवी यांच्यावर सूनेने मारहाणीचा आणि जबरदस्तीने बंगल्याबाहेर काढल्याचा आरोप केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हा प्रकार समजल्यानंतर ऐश्वर्या रायचे वडील आणि आमदार चंद्रिका राय यांनी राबडी देवी यांच्या निवासस्थानी धाव घेतली आहे. या संदर्भात, सचिवालय पोलिस ठाण्यात राबडी देवी यांच्याविरोधात एफआयआरही नोंदवण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. दुखापतीमुळे ऐश्वर्याला रुग्णालयात नेण्यात आले आहे. यावेळी ऐश्वर्या म्हणाली की, 'राबडी देवींनी माझ्या केसांना पकडून मला मारहाण केली. त्यानंतर १० सर्क्युलर रोडवर असणाऱ्या बंगल्यातून अंगरक्षकांकरवी मला घराबाहेर काढले'.

उस्मानाबादेत तहसीलदार आक्रमक झाले अन्...

Image result for lalu rabri aishwarya rai"

ऐश्वर्या आणि राबडी देवी यांच्यामध्ये वादावादी झाल्याचे समजल्यानंतर सचिवालय पोलिस स्टेशनचे पोलिस पथक राबडी देवी यांच्या निवासस्थानी आले होते. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रतापबरोबर ऐश्वर्याचे लग्न झाले आहे.

Image result for lalu rabri aishwarya rai"

दरम्यान, संध्याकाळी सहाच्या सुमारास ऐश्वर्या बंगल्याबाहेर आली व तिच्याबरोबर काय घडले त्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. तेजप्रतापला ऐश्वर्या रायपासून विभक्त व्हायचे आहे. त्यासाठी त्याने नोव्हेंबर २०१८ मध्ये घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून ऐश्वर्या रायने सासूबाईंवर आरोप करण्याची ही दुसरी वेळ आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rabri Devi pulled my hair assaulted me claims Aishwarya Rai