'मोदींच्या विरोधात बोलायचे की नाही हा माझा प्रश्न' 

वृत्तसंस्था
बुधवार, 20 जून 2018

मोदींच्या विरोधात बोलायचे की नाही हा माझा प्रश्न आहे आणि ते वेळ आल्यावर मी ठरवेल, असे स्पष्ट मत रोहित वेमुलाच्या आई राधिका वेमुला यांनी आज (मंगळवार) व्यक्त केले. त्या एका पत्रकार परिषदेदरम्यान बोलत होत्या. मुस्लिम लीगने मला पैसे देण्याचे वचन दिले होते. परंतु, त्यांनी माझा वापर कुठल्याही राजकीय फायद्यासाठी केलेला नाही. मुस्लिम लीगने आम्हाला अडीच लाख रुपयांचे दोन चेक दिले होते. त्यातील एक चेक बाऊंस झाल्याचे आम्ही त्यांना कळवले आहे. त्यावर त्यांनी रोख रक्क्म देऊ असे सांगितल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

नवी दिल्ली- मोदींच्या विरोधात बोलायचे की नाही हा माझा प्रश्न आहे आणि ते वेळ आल्यावर मी ठरवेल, असे स्पष्ट मत रोहित वेमुलाच्या आई राधिका वेमुला यांनी आज (मंगळवार) व्यक्त केले. त्या एका पत्रकार परिषदेदरम्यान बोलत होत्या. मुस्लिम लीगने मला पैसे देण्याचे वचन दिले होते. परंतु, त्यांनी माझा वापर कुठल्याही राजकीय फायद्यासाठी केलेला नाही. मुस्लिम लीगने आम्हाला अडीच लाख रुपयांचे दोन चेक दिले होते. त्यातील एक चेक बाऊंस झाल्याचे आम्ही त्यांना कळवले आहे. त्यावर त्यांनी रोख रक्क्म देऊ असे सांगितल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या विरोधी पक्षावर केलेल्या आरोपाचे रोहितच्या आई राधिका यांनी पूर्णपणे खंडन केले आहे. गोयल यांनी आरोप केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण दिले.

दरम्यान, हैद्राबाद विश्वविद्यालयातील विद्यार्थी रोहित वेमुलाच्या मुद्द्यांवर राजकारण पुन्हा जोर धरत आहे. मुस्लिम लीगने रोहित वेमुलाच्या आईला घरासाठी 20 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, ते त्यांनी पूर्ण केले नाही. यावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर भारतीय जनता पक्षाने जोरदार टीका केली आहे. केंद्रिय मंत्री पियुष गोयल यांनी राहुल गांधीवर टीका करताना म्हटले आहे की, 'रोहित वेमुलाच्या नावावर राहुल गांधी राजकारण करत आहे. भाजपा समाजामध्ये वितुष्टता पसरवत नाही. आमच्यासाठी प्रत्येक व्यक्ती मौल्यवान आहे. सर्वांना सोबत घेऊऩ काम करण्यावर आमचा भर आहे.'

मी, रोहित वेमुलाच्या आईचे बोलणे ऐकून चिंतीत आहे की, काही विरोधी पक्ष रोहित वेमुला प्रकरणाला राजकिय वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत. रोहितचे कुटुंब एका तणावग्रस्त वातावरणातून वावरत असताना, राजकीय उद्देश ठेऊन रोहितच्या कुटुंबियांना पैशांचे खोटे आश्वासन देण्यात आले आहे. यामध्ये त्यांच्या भावनांसोबत खेळ केला जात आहे, असेही पियुष गोयल यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: radhika vemula statemeny after piyush goyal criticise on rahul gandhi